मुंबई प्रतिनिधी | विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने महापोर्टलवर घेतल्या जातात. मात्र, राज्य शासनाच्या महापोर्टलबाबत अनेक तक्रारी असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल बंद करून नवे पोर्टल सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज केली.
माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे ‘महापोर्टल’ रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही या मागणीला पाठिंबा दिला असल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले. निवडणूक प्रचारात सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यास महापोर्टल बंद करणार असल्याचे आश्वासन दिले होते, हे येथे उल्लेखनीय.
शासकीय नोकरभरतीसाठी यापुर्वीच्या सरकारने सुरु केलेले महापोर्टल बंद करावे,अशी मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली.या सेवेत पारदर्शकता नाही अशी उमेदवारांची तक्रार असून पात्र उमेदवारांवरही अन्याय होतोय.त्यामुळे ते बंद व्हावे ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली@CMOMaharashtra pic.twitter.com/YTVbbkL9iZ
— Supriya Sule (@supriya_sule) December 1, 2019
https://m.facebook.com/542211249669763