पुणे प्रतिनिधी | बारामती दूध संघ आणि सोमेश्वर सहकारी कारखाना यांच्या वतीने बारामतीच्या जिरायत भागात पळशी आणि सुपे याठिकाणी चारा छावणी सुरु करण्यात आल्या. आज चारा छावनीला बारामती लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित खासदार मा.सौ.सुप्रियाताई सुळे यांनी भेट देऊन माहिती घेतली.
शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत असताना चारा व्यवस्थित मिळतो का ? उत्तम पद्धतिचा असतो का? एकूण जनावरे किती ? अशी संपूर्ण माहिती घेतली . तसेच सुप्रिया सुळे यांनी यावेळी अष्टविनायकापैकी एक असलेल्या मोरगावच्या मोरेश्वरचे दर्शन घेऊन राज्यातील दुष्काळी परिस्थिती कमी व्हावी असे साकड़े मोरेश्वर चरणी घातले.
यावेळी विश्वासराव देवकाते, पुरुषोत्तम जगताप , भरत खैरे, संजय भोसले, संदीप जगताप, संभाजी होळकर, लाला माळशिकारे, शौकत कोतवाल, सौरभ राऊत, दूध संघ व कारखाना सर्व संचालक, गोपालक, शेतकरी उपस्थित होते.