हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मुंबईमध्ये (Mumbai) फक्त मराठीत भाषा बोलली जावी, यासाठी लढा सुरू आहे. अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याने वादाला तोंड फुटेल असे वक्तव्य केले आहे. त्यांनी थेट, मुंबईत मराठी शिकणे गरजेची नसल्याचे म्हणले आहे. सरकार्यवाह सुरेश भैय्याजी जोशी ( Suresh Bhaiyyaji Joshi) यांनी, गुजराती ही घाटकोपरची भाषा असल्याचे देखील सांगितले आहे. हे वक्तव्य करत असताना त्यांच्यासोबत राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हेदेखील होते.
आताच्या घडीला मुंबईमध्ये मराठी माणसांना भाड्याने घरे दिले जात नाहीयेत, मराठी भाषेमुळे त्यांच्यावर इतर भाषिक लोक बंधने घालत आहेत त्याच्यामुळे हा वाद टोकाला पोहोचला आहे अशा परिस्थितीतच भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या वादात आणखीन तेल पडले आहे. भैय्याजी जोशी यांनी हे वक्तव्य मुंबईतीलच विद्या विहार येथील एका कार्यक्रमांमध्ये केले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, “मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. भारताच्या परंपरेत असे महापुरुष असतात असे महापुरुष स्वतःला अहंकारापासून मुक्त करण्यासाठी आपण जे कार्य करतो ते ईश्वराचा कार्य आहे. म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, असं शिवाजी महाराज म्हणायचे,”
त्याचबरोबर, संघाच्या शाखेत काम करणारा प्रत्येकजण ईश्वरी कार्य करत आहे. स्वयंसेवक नावाची ही शक्ती आहे. असे जोशी यांनी म्हटले. त्याचबरोबर, “ज्यांच्याबद्दल आज आपण ऐकलं आहे, असे जाम साहेब सुद्धा आहेत. आपल्यातल्या अनेकांनी त्यांना पाहिलं आहे. मुंबई ते कन्याकुमारी त्यांनी काम केलं आहे. जामसाहेब यांचे नाव या संस्थेला आहे, हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे.बिर्ला मंदिर अनेक ठिकाणी आहेत, बिर्ला यांनी अनेक मंदिर बांधले पण आतमध्ये देवता कोण आहे, त्यात जाऊन पहावं लागतं. चांगलं जीवन साधनेमधूनच प्राप्त होतं” असे भाष्य जोशी यांनी कार्यक्रमात केले.