सुरेश प्रभू यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह ; मात्र तरीही एकांतवासात रहाण्याचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाचे खासदार आणि माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आपली कोरोना चाचणीकरून घेतली मात्र त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. असं असतानाही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांनी एकांतवासात रहाणे पसंत केले आहे.  सुरेश प्रभू हे १० मार्च रोजी सौदी अरेबियात शेरपास बैठकीत सहभाग घेऊन परतले आहेत. यापूर्वी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी स्वतःला वेगळं ठेवलं होतं.

दरम्यान थिरुवअनंतपुरम येथील एका डॉक्टरच्या संपर्कात आल्यामुळे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी एकांतवासात राहण्याचा निर्णय घेतला होता. हे डॉक्टर स्पेनवरुन भारतात परतले होते. तसेच त्यांची चाचणी पॉझिटिव्ह येण्याआधी त्यांनी दहा दिवस रुग्णालयात काम केलं होतं.

त्यावेळी एका बैठकीदरम्यान मुरलीधरन या डॉक्टरांच्या संपर्कात आले होते. मुरलीधरन यांनी दिल्लीस्थित आपल्या घरातच वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांची करोनाची चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. मुरलीधरन यांनी संसदेपासूनही दूर आहेत तसेच त्यांनी नुकतेच भाजपाच्या संसदीय बैठकीलाही ते गैरहजेर राहिले.

Leave a Comment