शिवसेनेचा कोल्हापूरचा वाघ स्वगृही परत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर |  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपली असताना अनेक ठिकाणी पक्षप्रवेश कार्यक्रम जोरात चालु आहेत. यामध्ये शिवसेना देखील मागे नाही. शिवसेनेचे जुने शिव सैनिक देखील स्वगृही परतत आहेत.जिल्ह्यात शिवसेनेची मुहूर्तमेढ करणारे मात्र गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेपासून अलिप्त असलेले माजी आमदार सुरेश साळोखे आज स्वपक्षी परतले.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर साळोखे यांच्या शिवसेना प्रवेशाने कोल्हापूरात पक्षाला बळ मिळणार आहे.दोन वेळा कोल्हापूर मधून शिवसेनेचे आमदार राहिलेले साळोखे यांनी बुधवारी दुपारी मुंबईत ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पक्षप्रवेश केला. साळोखे सन १९९५ आणि सन १९९९ अशा दोनवेळा आमदार म्हणून विजयी झाले.

मात्र मध्यंतरीच्या काही काळात साळोखे शिवसेनेपासून अलिप्त राहिले होते. विशेष म्हणजे, कोल्हापुरात कपिलतीर्थ मार्केट येथे शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवण्यात त्यांचा प्रमुख पुढाकार होता. त्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कोल्हापुरात आले होते.