Surge S32 : नाद खुळा!! Hero ने केली कमाल; 3 चाकीचं रूपांतर इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये (Video)

Surge S32 new innovation (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Surge S32 । सध्या तंत्रज्ञान एका नव्या उंचीवर गेलं आहे. दिवसेंदिवस हे जग अपडेट होत असून दररोज नवं काहीतरी पाहण्याची सवय लागली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात सुद्धा त्याचा परिणाम दिसून येत आहे. आत्तापर्यंत तुम्ही बाजारात अनेक वेगवेगळ्या गाड्या बघितल्या असतील, हवेत उडणाऱ्या कार बद्दल तुम्ही ऐकलं असेल किंवा उलट्या फिरणाऱ्या ट्रेनबद्दल सुद्धा तुम्ही पाहिले असेल. त्यातच आता प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी Hero ने एक नवा अविष्कार करून दाखवला आहे. हिरोने बाजारात अशी एक गाडी आणली आहे जी ३ चाकाची असली तरी तुम्ही अवघ्या २ मिनिटात त्याचे रूपांतर इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये करू शकता.

Hero MotoCorp ने जयपूर येथे आयोजित Hero World 2024 मध्ये Surge S32 मल्टीपर्पज थ्री-व्हीलरचे कन्सेप्ट मॉडेल सादर केले. SURGE असे या गाडीचे नाव असून हि गाडी ३ चाकी सुद्धा होते आणि एका क्षणात तिचे रूपांतर इलेक्ट्रिक स्कुटरमध्येही करू शकते. एवढच नव्हे तर जेव्हा या गाडीचे ३ चाकी गाडीत रूपांतर करून तुम्ही त्यावरून ५०० किलोच्या सामानाची वाहतूक सुद्धा करू शकताय. याबाबतचा विडिओ सुद्धा समोर आला असून तुमचीही बोट तोंडात जातील.

सोशल मीडियावर हर्ष गोएंका यांनी हिरोच्या या थ्री-व्हीलरचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी म्हंटल कि, हिरोने भारतीय अभियांत्रिकीचा आत्मा आणि कल्पकता दाखवून एक क्रांतिकारी तीन चाकी गाडी सादर केली आहे जी दुचाकीमध्ये बदलली जाऊ शकते. हे खरोखर आश्चर्यकारक आहे. त्यांच्या या विडिओवर अनेकांनी वेगवेगळ्या कंमेंट्स केल्या आहेत. एका यूजर्सने लिहिले की ही गाडी खरोखर खूप उपयुक्त आहे आणि लोकांच्या गरजा पूर्ण करू शकते. तर दुसऱ्या एका यूजर्सने म्हंटल कि, मला वाटते की अशा वाहनांमुळे ऑटोमोबाईल मार्केटमध्ये क्रांती होईल.

काय आहेत फीचर्स- Surge S32

खरं तर या विडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता, हे इलेक्ट्रिक वाहन (Surge S32) आधीपासूनच तीन चाकी आहे परंतु समोरच्या सीटवरच एक इलेक्ट्रिक स्कूटर लपलेली आहे, ज्यावर बटण दाबून स्कूटर फक्त काही मिनिटांत बाहेर काढू शकता, म्हणजेच समोरच्या सीटवर असलेली स्कूटर टू-व्हीलर मोडमध्ये रूपांतरित करू शकतील आणि दोन लोक त्यामध्ये सहज प्रवास करू शकतील. या अनोख्या गाडीमधील तीन चाकी आणि दुचाकी या दोन्ही साठी वेगवेगळे पॅरामीटर्स देण्यात आले आहेत. तुम्ही जर ३ चाकीचा वापर करणार असेल तर 10KW पॉवर आणि 11 kWh बॅटरी सह तुम्ही 500 ​​किलो पर्यंत वाहतूक आरामात करू शकता. यावेळी गाडीचे टॉप स्पीड ताशी 50 किलोमीटर इतकं राहील. आणि जर तुम्ही या गाडीचा टू व्हिलर म्हणून वापर करणार असेल तर तुम्हाला 3Kw पॉवर आणि 3.5 kWh बॅटरी मिळेल आणि तुमच्या गाडीचे टॉप स्पीड 60 किलोमीटर प्रतितास इतकं राहील