Ladaki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे सर्वेक्षण थांबले!! कठोर नियमानमुळे महिलांकडून नाराजी व्यक्त

0
3
Ladaki Bahin Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ladaki Bahin Yojana| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. मात्र, अलीकडेच या योजनेच्या निकषांमध्ये कठोर बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यभरात लाभार्थ्यांचे पुनर्सर्वेक्षण सुरू आहे. राज्य सरकारच्या कठोर नियमानंतर अनेक महिलांनी आपले अर्ज स्वतःहून मागे घेतले आहेत, तर निकषांत न बसणाऱ्या अर्जदार महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत.

अंगणवाडी सेविकांचा सर्वेक्षणासाठी विरोध

सध्या लाडकी बहिणी योजनेसाठी राज्यातील विविध भागांत हे सर्वेक्षण सुरू आहे. अशातच अंगणवाडी सेविकांनी त्यात सहभागी होण्यास नकार दिला आहे. यामागे मुख्य कारण म्हणजे सरकारने यापूर्वी अर्ज भरण्याच्या कामासाठी जाहीर केलेला भत्ता अद्याप दिलेला नाही. योजना सुरू झाल्यानंतर, अर्ज भरल्यास प्रति अर्ज ५० रुपये भत्ता देण्याचे आश्वासन सेविकांना देण्यात आले होते. मात्र, हा भत्ता अद्याप मिळालेला नसल्याने सेविकांनी नवीन सर्वेक्षण करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

महिलांच्या अर्जाची पुनर्समीक्षा सुरू (Ladaki Bahin Yojana)

विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात फेरतपासणी केली जात आहे. शासनाने निकषांत न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे अशा महिलांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. मात्र, मागील मिळालेले पैसे वसूल केले जाणार नाहीत, असे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, त्या महिलांनी स्वइच्छेने अर्ज मागे घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

लाभार्थ्यांना पुढील हप्त्याची प्रतीक्षा (Ladaki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेअंतर्गत(Ladaki Bahin Yojana) जुलै 2024 पासून महिला आणि तरुणींना आर्थिक मदत दिली जात आहे. आतापर्यंत या योजेनचेसात हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. मात्र, बायोमेट्रिक पडताळणीच्या अडचणींमुळे अनेक महिलांना सहावा आणि सातवा हप्ता मिळालेला नाही. दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या नव्या नियमांमुळे अनेक महिलांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागले आहे. यामुळे राज्यातील महिलांकडून या योजनेबाबत आता नाराजी व्यक्त केली जात आहे.