सूर्या ऑन फायर! T-20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (suryakumar yadav) याने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध शेवटच्या आणि निर्णायक तिसऱ्या T-20 मध्ये धडाकेबाज शतक झळकावले. सूर्यकुमार यादवच्या T-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे तिसरे शतक ठरले. काल राजकोट या ठिकाणी खेळल्या गेलेल्या सामन्यात सूर्याने (suryakumar yadav) 51 चेंडूंत 7 चौकार आणि 9 षटकारांसह नाबाद 112 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाने श्रीलंकेसमोर 228 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते.

अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच फलंदाज
सूर्यकुमार यादवने (suryakumar yadav) याआधी जुलै 2022 मध्ये त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले T-20 शतक इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहँममध्ये झळकावले होते. या सामन्यात त्याने 55 चेंडूत 117 धावा केल्या होत्या. त्यानतंर नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने 51 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या होत्या. तसेच कालच्या सामन्यात त्याने श्रीलंकेविरुद्ध 51 चेंडूंत 7 चौकार आणि 9 षटकारांसह नाबाद 112 धावा केल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे हि तिन्ही शतके त्याने सलामीला न येत केली आहेत. T-20 मध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.

रोहितचा रेकॉर्ड मोडण्यापासून एक पाऊल दूर
T-20 क्रिकेटमध्ये तीन शतके करणाऱ्या सूर्यकुमारच्या पुढे आता शतकांच्या बाबतीत रोहित शर्मा आहे. T-20 मध्ये सर्वात कमी चेंडूत शतक साजरं करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये सूर्यकुमार यादव (suryakumar yadav) दुसऱ्या नंबरवर आहे. पहिल्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. त्याने 35 तर सूर्यकुमार यादवने 45 चेंडूत शतक झळकावलं आहे. रोहित शर्माच्या नावावर चार T-20 आंतरराष्ट्रीय शतके आहेत.

हे पण वाचा :
Tour Packages : कमी पैशात करा परदेशी दौरा; IRCTC ने आणलं खास पॅकेज
LIC मध्ये महिन्याला 1358 रुपये जमा करा आणि 25 लाख रुपये मिळवा
PM Kisan Yojana : 13 वा हप्ता तुम्हांला मिळणार की नाही?
नवीन वर्षात अगदी स्वस्तात घरी घेऊन जा ‘हे’ 10 स्मार्ट अन् ब्रँडेड TV
धक्कादायक घटना : बाल्कनीत अडकलेल्या 15 वर्षीय मुलीचा आगीमुळे तडफडून मृत्यू