PM Kisan Yojana : 13 वा हप्ता तुम्हांला मिळणार की नाही? ‘या’ List मध्ये करा चेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) ही एक लोककल्याणकारी योजना केंद्र सरकारकडून राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशातील पात्रअसलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपये असे वर्षाकाठी 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 12 हप्ते देण्यात आले असून 13 व्या हप्त्याची वाट शेतकरी पाहत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

जे पात्र शेतकरी 13 व्या (PM Kisan Yojana) हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना यावेळी पीएम किसान योजनेचे पैसे मिळतील की नाही हे त्यांच्या स्टेटसमधील मेसेजद्वारे कळू शकते. जर शेतकऱ्यांना 13 वा हप्ता मिळेल की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी प्रथम जमीन बियाणे, केवायसी आणि त्यांच्या पात्रता संबंधित माहिती तपासावी.जर स्टेटसमध्ये या तिघांच्या पुढे YES लिहिले असेल तर तुमच्या खात्यात 13व्या हप्त्याची रक्कम येऊ शकते. जर NO लिहिले असेल तर मात्र तुमच्या खात्यावर पैसे येणार नाहीत.

असं करा चेक- (PM Kisan Yojana)

सर्वप्रथम पात्र (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांनी अधिकृत किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ ओपन करावं. येथे तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस चा पर्याय दिसेल.
बेनिफिशियरी स्टेटसवर क्लिक करा, त्यानंतर या योजनेशी संबंधित रजिस्ट्रेशन नंबर किंवा 10 अंकी मोबाइल क्रमांकावर क्लिक करा.
यानंतर, खाली दिलेल्या बॉक्समध्ये वेबसाइटच्या स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड भरा.
यानंतर, शेतकऱ्याच्या वेबसाइटवर दिसणार्‍या Submit बटणावर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला समोरच्या स्क्रीनवर स्टेटस दिसेल.
यामध्ये e-KYC, पात्रता आणि जमीन बीजारोपण समोर (YES) होय किंवा (NO) नाही लिहिलेले आहे ते तुम्हाला समजेल.