Suryakumar Yadav New Flat। भारतीय क्रिकेट संघाचा t २० कर्णधार आणि आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) भर आयपीएलच्या मोसमात मुंबईत २ नवीन घरे खरेदी केली आहे. मुंबईतील अतिशय पॉश एरियात सूर्याने फ्लॅट घेतले असून दोन्ही घरांची किंमत जवळपास २१ कोटींच्या आसपास आहे. या दोन्ही फ्लॅटसाठी सूर्यकुमार यादवकडून 25 मार्च 2025 रोजी व्यवहार करण्यात आला. महत्वाचे म्हणजे सूर्यकुमार यादवला मुंबई इंडियन्सने 16.35 कोटी रुपयात रिटेन केल आहे, म्हणजेच त्याला जितके पैसे मिळाले त्याच्यापेक्षाही त्याने खरेदी केलेल्या फ्लॅटची किंमत जास्त आहे.
कुठे खरेदी केले सूर्याने नवीन घर – Suryakumar Yadav New Flat
सूर्यकुमार यादवचे हे दोन्ही फ्लॅट (Suryakumar Yadav New Flat) गोदरेज स्काय टेरेस प्रोजेक्टमध्ये आहेत. टोटल कारपेट एरिया 4,222.7 चौरस मीटर आहे. सूर्याचे हे दोन्ही फ्लॅट अपार्टमेंट वेगवेगळ्या मजल्यावर आहेत. ज्या अपार्टमेंटमध्ये त्याचा फ्लॅट आहे, तिथे 6 लेयर कार पार्किंग एरिया सुद्धा आहे असं बोललं जातंय. देवनार हे पूर्व मुंबईतील एक निवासी क्षेत्र आहे . हा एरिया हार्बर लाईनवरील चेंबूर रेल्वे स्टेशन, मुंबई मोनोरेल आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि सायन-पनवेल एक्सप्रेस वे सारख्या प्रमुख रस्ते मार्गांशी जोडलेला आहे.
बाकी, सूर्यकुमार यादव सध्या आयपीएल मध्ये व्यस्त आहे. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने मुंबईचे नेतृत्व केलं होते, मात्र मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नई सुपर किंग्सकडून मुंबई इंडियन्सचा 4 विकेटने पराभव झाला. सूर्यकुमार यादवला सुद्धा पहिल्या सामन्यात विशेष अशी कामगिरी करता आली नाही. सूर्यकुमार २९ धावांवर बाद झाला होता.. आता आगामी सामन्यात चांगली कामगीरी करण्यावर त्याचा भर असेल.