सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाने अभिनेत्री रिया चक्रवर्तीची याचिका फेटाळली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडबरोबर राजकारण ढवळून निघालं आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्याप्रकरणी दरदिवशी नव्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान, सुशांतच्या नातेवाईकांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला त्याच्या आत्महत्येला जबाबदार धरत तिच्याविरोधात केस दाखल केली. यांनतर रियाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात जात ‘प्रोटेक्टिव ऑर्डर’ची विनंती केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

न्यायालयाने सांगितले की, प्रतिभावान अभिनेत्याचा असामान्यरित्या मृत्यू झाला आहे. सत्य सर्वांसमोर आलं पाहिजे. आता बिहार पोलीस रियाची चौकशी करेल. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्याला क्वारन्टीन करून जनतेसमोर चांगला संदेश ठेवला नाही. महाराष्ट्र सरकारलाही न्यायालयाने यासंबंधी प्रश्न विचारले. सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीसह ५ जणांविरोधात पटणातील राजीव नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली. यात त्यांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासोबत अनेक गंभीर आरोप केले. रियाने पैशांसाठी सुशांतला फसवल्याचंही त्यांनी यात म्हटलं.

दरम्यान, केंद्राने अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिली आहे. याशिवाय सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रिया चक्रवर्तीला समन्स पाठवला आहे. सुशांतची केस मनी लॉण्डिंगशी जोडली गेली असल्यामुळे ईडीने रियाला विचारण्यासाठी प्रश्नांची एक यादीच तयार केली आहे. ईडीने रियाला तिच्या मुंबईतील घरी आणि ईमेलमार्फत समन्स पाठवला आहे. असं म्हटलं जातं की ईडीची मुंबई ब्रान्च रियाची तीन भागांमध्ये चौकशी करणार आहे. यातील पहिल्या भागात तिला खासगी प्रश्न विचारण्यात येतील. यात रियाच्या वडिलांचं नाव काय, घरचा पत्ता काय आणि कुटुंबात किती व्यक्ती आहेत असे प्रश्न विचारण्यात येतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment