13 जूनला कोणतीही पार्टी झाली नाही ; उलट….सुशांतच्या शेजाऱ्यांचा धक्कादायक खुलासा

0
35
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या हाती जाताच हाचलाचींना वेग आला. चौकशीच्या या सत्रात काही मधक्कादायक खुलासे होऊ लागले. मागील 2-3 दिवसात सीबीआय तपासानं चांगलाच वेग पकडल्याचं पाहायला मिळालं. यातच आता सुशांतच्या इमारतीतील त्याच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.

आत्महत्येच्या एक दिवस आधी म्हणजेच 13 जूनला सुशांतच्या घरी कोणत्याही प्रकारची पार्टी झाली नव्हती, असा खुलासा शेजाऱ्यांनी केला आहे. उलट १३ जूनच्या रात्री सुशांतच्या घराची लाईट नेहमीपेक्षा जास्त लवकरच बंद झाली होती.यापूर्वी कधीच सुशांतच्या घरातील लाईट इतकी लवकर बंद झाली नव्हती, तो रात्री उशीरापर्यंत जागा असायचा. पण त्या रात्री स्वयंपाक घरातील लाइट सोडून सगळ्या घरातील लाइट्स बंद होते”, असं या माहितीतून समोर आलं.

शेजाऱ्यांनी दिलेली ही माहिती पाहता आता तपासाला नेमकं कोणतं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, शुक्रवारी साऱ्या देशाचं आणि कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या आत्महत्या प्रकरणीच्या या तपासाअंतर्गत कूपर रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी करण्यात आली. ज्यामध्ये मुंबई पोलिसांच्या सांगण्यावरुनच कोविड चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच सुशांतच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here