“फडणवीसांनी शिंदे गटाचा पद्धतशीर गेम…” सुषमा अंधारेंची शिंदे गटावर उपरोधिक टीका

sushma andhare
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (sushma-andhare) या मागच्या काही दिवसांपासून राज्यातील विविध मतदारसंघात जाऊन ‘महाप्रबोधन यात्रे’चं आयोजन करत आहेत. या यात्रेदरम्यान त्या (sushma-andhare) सभांमधून सातत्याने शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. या सभेदरम्यान ते शिंदे गटातील नेत्यांचा वारंवार ‘भाऊ’ असा उल्लेख करत आहेत. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी जोरदार टोलेबाजी केली.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
“आमचे भाऊ ओवाळून टाकले असले तरी ओवाळणी मागणं आपलं काम आहे” असा टोला सुषमा अंधारेंनी (sushma-andhare) लगावला आहे. त्या औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेदेखील त्यावेळी हजर होते. तसेच त्या पुढे म्हणाल्या, “महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून त्या त्यांच्या (शिंदे गटाच्या) सदसद्विवेकाला हात घालण्याचा प्रयत्न करत आहेत. ईडा पिडा टळू दे आणि भावाचं राज्य येऊ दे… असं मी म्हणते. पण माझ्या भावाचं राज्य आलंच नाही. भावाला राज्य आल्याचा केवळ भ्रम तयार करून दिला आहे. त्यांना केवळ पद दिलं आहे, पण अधिकार अजिबात दिले नाहीत. याउलट आपण खात्यांचा विचार केला तर लोकांचा थेट संबंध असलेली सर्व खाती शिंदे गटाकडे देण्यात आली आहेत.

यामुळे देवेंद्र फडणवीसांचं काहीही नुकसान होत नाही. फडणवीसांनी पद्धतशीर शिंदे गटाचा गेम करायचं ठरवलं आहे. या सरकारमधील सर्व महत्वाची खाती हि देवेंद्र फडणवीसांकडे आहेत. वित्त, जलसंधारण, जलसंपदा, गृह खातंही त्यांच्याकडे आहे. हे कमी होते म्हणून फडणवीसांनी सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपदं आणि उपमुख्यमंत्रीपदही आपल्याकडे घेतलं आहे. म्हणजे माझे चाळीस भाऊ उपाशी आणि एकटे देवेंद्र फडणवीस तुपाशी आहे. यामुळे मला भावांची काळजी वाटते” अशी उपरोधिक टीका सुषमा अंधारेंनी (sushma-andhare) यावेळी शिंदे गटावर केली.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय