नितु बाळा, तुझ्या वडिलांचे वस्त्रहरण करणाऱ्या देवेंद्रजींना तू ..; सुषमा अंधारेंची पोस्ट चर्चेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचा एक जुना विडिओ शेअर करत बाळासाहेबांशी गद्दारी कोणीं केली असा सवाल केला होता. त्यांनतर आता सुषमा अंधारे यांनीही राणेंवर पलटवार केला आहे. अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेतील भाषण करतानाच जुना व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये फडणवीस नारायण राणे यांच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचताना दिसत आहे. या विडिओ सोबत अंधारे यांनी भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. नितु बाळा, तुझ्या वडिलांचे वस्त्रहरण करणाऱ्या देवेंद्रजींना तू नेता कसे काय स्वीकारले असेल बरे? असा उलट सवाल त्यांनी नितेश राणे याना केला आहे.

सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट नेमकी काय …

प्रिय नीतू
बाळा,

तुझा अभ्यास फारच कच्चा आहे. तुला अजून होमवर्कची गरज आहे. तब्बल वीस वर्षांपूर्वीचा महाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धेतला व्हिडिओ शेअर करताना किमान चेहरापट्टीतील बदल तरी तू लक्षात घ्यायला हवा होतास.

पण पण असू दे बाळा. मुळात माझ्या भावाने तुझ्या अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर तू आता अशा अर्ध्या कच्च्या संकल्पना घेऊन बोलत राहिला नसतास.

https://www.facebook.com/100000324369123/videos/3062900624001945/

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल 2015 सालचं तुझं ट्विट ही जर तुझी आज चूक असेल तर ते तू अजूनही डिलीट का केले नाहीस? किंवा गानसम्राज्ञी लता मंगेशकरजी या मोदीजींच्या स्टेजवर गेल्या म्हणून तू त्यांचा भारतरत्न परत मागितला या तुझ्या बालिश वक्तव्यांवर मी अजिबात बोलणार नाही.

मी तुला अस्सल व्हिडिओ तुझ्या आजमितीला असणाऱ्या प्राणप्रिय नेत्याचा तुला पाठवत आहे. भर सभागृहात आपल्याच सख्ख्या वडिलांचे म्हणजेच माझ्या बाबांचे वस्त्रहरण करणाऱ्या देवेंद्रजींना तू नेता कसे काय स्वीकारले असेल बरे? हा व्हिडिओ ऐकल्यावर जर तुला काही शंका उपस्थित होणार असतील तर मला पुन्हा एकदा अभ्यास घ्यायला आवडेलच.

तुझी आत्या

नितेश राणे यांनी काय ट्विट केलं होत?

हिंदुह्रदयस्रमाट बाळासाहेब ठाकरेंची थिल्लरपणे टवाळी करणाऱ्यांच्याच हातात शिवबंधन? अरे किती ती सत्तेसाठी लाचारी! सांगा कुणी केली बाळासाहेबांसोबत गद्दारी? असं ट्विट करत नितेश राणे यांनी सुषमा अंधारे याना डिवचलं होत. तसेच यापूर्वीच्या त्यांच्या भाषणाचा जुना व्हिडिओही शेअर केला होता.