हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांकडून टीका केली जाते. मात्र मोदी त्याकडे फार्स लक्ष देत नाहीत. मात्र तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय एम करुणानिधी यांचे नातू, द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या एका टिकेमुळं प्रधानमंत्री मोदी यांना नक्कीच विचार करायला लावणार आहे. ते म्हणजे “पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या छळामुळे आणि दबावामुळेच भाजपा नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू झाला” असं उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं आहे. तसेच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
उदयनिधी स्टॅलिन यांनी “सुषमा स्वराज नावाची एक व्यक्ती होती. मोदींनी टाकलेल्या दबावामुळेच त्यांचा मृत्यू झाला. अरुण जेटली नावाचीही एक व्यक्ती होती. मोदींनी केलेल्या छळामुळेच त्यांचा मृत्यू झाला” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. एका सभेत बोलत होते. पंतप्रधान पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत असल्याचं देखील म्हटलं आहे. “तुम्ही सर्वांनाच बाजूला केलं. मिस्टर मोदी, मी ई पलानीस्वामी नाही जो तुम्हाला घाबरेल आणि तुमच्यासमोर झुकेल. मी उदयनिधी स्टॅलिन आहे” असं त्यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
नरेंद्र मोदींवर उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या गंभीर आरोपांना सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी उत्तर दिलं आहे. उदयनिधी यांनी आपल्या आईच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करू नये असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच अरुण जेटली यांची मुलगी सोनाली जेटली यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उदयनिधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “उदयनिधीजी तुमच्यावर निवडणुकीचा दबाव आहे हे मी समजू शकते. पण तुम्ही माझ्या वडिलांच्या आठवणींचा अनादर करणार असाल तर शांत बसणार नाही” असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.