तृतीयपंथीयाचा संशयास्पद मृत्यू : घरातील सोन्या- चांदीचे दागिने गायब झाल्याने घातपाताची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर | शिये येथील एका तृतीयपंथीयाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्याच्या घरातील सोन्याचे दागिने गायब असून घराच्या दाराला बाहेरून कडी होती. त्यामुळे हा मृत्यू नैसर्गिक की घातपात असा प्रश्न उपस्थित होत आहे. सतीश हैबतराव पवार ऊर्फ देवमामा (वय 42, सध्या रा. रामनगर, शिये, मूळगाव हुपरी, ता. हातकणंगले) असे तृतीयपंथी व्यक्तीचे नाव आहे. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थाळाचा पंचनामा करुन तपास करीत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिये येथील रामनगरमध्ये सतीश पवार हा तृतीयपंथीय गेली 10 वर्षे रहात आहे. तृतीयपंथी असल्याने तो आपले आयुष्य देवीचा जोगता म्हणून जगत होता. त्यांच्याकडे अनेक लोक ये- जा करत असायचे. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात सोन्या- चांदीचे दागिने होते. तीन वर्षीपूर्वी त्याच्या घरातून सोन्या चांदीच्या दागिन्याची चोरी झाली होती. पण देवाच्या दागिने चोरल्याने देवाचा कोप होईल या भितीने चोरट्याने दागिने आणून परत दारात टाकले होते.

आज सकाळी अमृत पवार हे नाष्टा घेऊन घरी आले. त्यांनी सतीश पवार यांस झोपेतून जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सतीशचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. याबाबत तात्काळ शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे. या तृतीयपंथी व्यक्तीच्या मृत्यूबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. ज्यावेळी ही घटना उघडकीस आली त्यावेळी घराला बाहेरून कडी होती. याचबरोबर घरातील सोन्या चांदिचे दागिने गायब झाले आहेत.

Leave a Comment