सचिन वाझेंचा कोठडीतील मुक्काम वाढला; 3 एप्रिलपर्यंत कोठडीतच मुक्काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अँटिलिया स्फोटकं प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन वाझेंच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. सचिन वाझेंना ३ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. वाझे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) ताब्यात आहेत. वाझे यांना १३ मार्चला अटक करण्यात आली.

सचिन वाझेंना यापूर्वी एनआयएने 14 मार्च रोजी एनआयएच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टाने त्यांना 25 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली होती. आज वाझेंची कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने वाझेंच्या कोठडीत नऊ दिवसांची म्हणजे 3 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

यावेळी एनआयएने कोर्टाला आज अत्यंत धक्कादायक माहिती दिली. वाझेंना पोलीस अधिकारी म्हणून सरकारी कोट्यातून 30 जिवंत काडतुसे देण्यात आली होती. तसेच त्यांना एक रिव्हॉल्वर देण्यात आली होती. 30 पैकी पाच बुलेट्स वाझेंकडे आहेत. मात्र 25 काडतुसे गायब आहेत. ही 25 काडतुसे कुठे गेली याबाबत वाझे काहीही माहिती देत नसल्याचंही एनआयएने कोर्टाला दिली.

मला बळीचा बकरा केलं जातंय; वाझेंचा दावामुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक ठेवण्याच्या कटाचे मुख्य सूत्रधार वाझेच असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत. मला बळीचा बकरा केलं जात असल्याचा दावा त्यांनी केला. मी समाजाविरोधात कट केलेला नाही. तसं असल्यास एनआयएनं ते सिद्ध करावं. मी एनआयएला तपासात, चौकशीत पूर्ण सहकार्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा कोठडी देऊ नका, अशी विनंती वाझेंनी न्यायमूर्तींकडे केली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group