दहावी- बारावीच्या विद्यार्थिनींना बुरखा घालून परीक्षा देऊ द्या, हॅपी टू हेल्प फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने केली बोर्डाकडे विनंती

औरंगाबाद | दहावी- बारावीच्या परीक्षेत मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनीना बुरखा किंवा स्कार्फ घालून परीक्षा देण्याची अनुमती द्यावी, यासह आदी मागण्यांसाठी हॅपी टू हेल्प फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ औरंगाबाद  विभागीय सचिव  सुगता पुन्ने यांची भेट घेतली.

हॅपी टू हेल्प फाऊंडेशनच्या वतीने बोर्डाच्या सचिव पुन्ने यांच्याशी माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा एप्रिल-मे २०२१ संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी परीक्षांमध्ये मुस्लिम समाजातील मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा किंवा स्कार्फ घालून परीक्षा देण्याची अनुमति द्यावी तसेच परीक्षा हॉल व परीक्षा केंद्रात प्रवेश करतांना महिला पोलीस अधिकारी, शिक्षिकांतर्फे सर्व पळताडणी करण्यात यावी.  यात काहीही अडचणी नाही. तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा एप्रिल-मे २०२१ ची परीक्षा ही मुस्लिम बांधवांचा सण रमजान या महिन्यात येत असल्यामुळे परीक्षेचे काही पेपर हे दुपारी ३ ते सायं ६ : ३० वाजेपर्यंत आहे.

या पेपरच्या वेळी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना उपवास सोडण्याची वेळ असल्याकारणाने या वेळेत कृपया बदल करण्यात यावे, अशी विनंतीही करण्यात आली. सदरील पेपर सकाळच्या सत्रात किंवा मागे पुढे घेऊन ही अडचण दूर करण्यासाठी कार्यालयातून पाठपुरावा व्हावे ही विनंती करण्यात आली. यावेळी विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी राज्य मंडळाकडे निवेदन पाठविण्यात येईल व मागण्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

यावेळी हॅपी टू हेल्प फाऊंडेशन व मेयार अससोसिएशनचे विभागीय अध्यक्ष शेख अब्दुल रहीम, शफीक पठाण, सय्यद अब्दुल रहीम, शेख यासेर, डॉ. सोहेल नवाब, सय्यद ताजीम, मोहसीन खान आदींची उपस्थिती होती.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like