हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संसदेच हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत असून राज्यसभेत गोंधळ केल्याच्या कारणावरून आज 12 खासदारांचे निलंबन करण्यात आलं आहे. यामध्ये सीपीएम आणि सीपीआयचे प्रत्येकी एक, काँग्रेसचे सहा, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन असे खासदार आहेत.
The 12 Rajya Sabha MPs have been suspended for indiscipline in the last session of the House.
The House has been adjourned till tomorrow, 30th November
— ANI (@ANI) November 29, 2021
दरम्यान, या खासदारांमध्ये प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई, अखिलेश प्रताप सिंग यांचा समावेश आहे. सभागृहाचे कामकाज उद्या, ३० नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. या खासदारांचं हे निलंबन चालू सत्राच्या उर्वरित भागासाठी करण्यात आलं आहे.
कोण कोण निलंबित?
१. एलामरम करीम (सीपीएम)२. फुलो देवी नेताम (काँग्रेस)३. छाया वर्मा (काँग्रेस)४. रिपुन बोरा (काँग्रेस)५. बिनय विश्वम (सीपीआय)६. राजामणी पटेल (काँग्रेस)७. डोला सेन (तृणमूल)८. शांता छेत्री (तृणमूल)९. सय्यद नासिर हुसेन (काँग्रेस)१०. प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना)११. अनिल देसाई (शिवसेना)१२. अखिलेश प्रसाद सिंह (काँग्रेस)