संजय राऊत एकदा तरी शेतकऱ्यांवर,अतिवृष्टीवर बोलले का? फडणवीसांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून शिवसेना खासदार संजय राऊत हे सातत्याने भाजपवर टीका करत असतात. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी संजय राऊत यांना कोणी गांभीर्याने घेऊ नये असं म्हणत टोला लगावला आहे. एका वृत्तवाहिनिला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी विविध विषयांवरून महाविकास आघाडीला लक्ष्य केले.

फडणवीस म्हणाले, संजय राऊतांना तुम्ही फार गंभीरपणे घेऊ नका. या सरकारने काही लोक असे नियुक्त केले आहेत की त्यांना कामच असं महत्त्वाच्या आणि आवश्यक गोष्टींकडून नरेटीव्ह दुसरीकडे न्यायचा. ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्याची चर्चा हे करतात. संजय राऊत एकदा तरी शेतकऱ्यांबाबत बोलले का? एकदा तरी अतिवृष्टीवर बोलले का, एकदा तरी पुराबाबत बोलले का, आत्महत्या होत आहेत त्यावर बोलले का… नाही… नाही बोलले. कारण त्यांना हेच काम आहे असा टोला फडणवीस यांनी राऊतांना लगावलाय.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार आम्ही पाडणार नसून ते अंतर्विरोधानेच पडेल असा दावा यावेळी फडणवीस यांनी केला. तसेच ज्या दिवशी सरकार पडेल. तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देऊ असेही फडणवीस यांनी म्हंटल.

You might also like