निलंबन आदेश : नागठाणे येथील ग्रामसेवकाच्या चाैकशीसाठी तीन सदस्यीस समिती

ZP Satara
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | नागठाणे (ता. सातारा) येथील ग्रामपंचायतीमधील अनियमितता व गैरव्यवहारांच्या तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी ग्रामसेवक सचिन पवार यांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत. तसेच त्यांच्यावर आलेल्या तक्रारीसंदर्भात तीन सदस्यांची चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.

नागठाणे ग्रामपंचायतीने गाळे बांधकामापोटी बेकायदेशीर पध्दतीने लोकांच्याकडून एक वर्षापासून पैसे गोळा केल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री मोहिते यांनी केला होता. याशिवाय ग्रामपंचायत नागठाणे येथील कामकाजातील अनियमिततेबाबत पाच तक्रार अर्ज जिल्हा परिषद प्रशासनाकडे दाखल झाले होते. या तक्रारीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी ग्रामसेवक सचिन पवार याला निलंबित केले आहे.

या तक्रारींच्या चौकशीसाठी कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, फलटण पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी विनायक गुळवे, जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील लेखाधिकारी आर. डी. सादीगले या तीन सदस्यांची समिती गठित केली आहे. या समितीने तक्रारीच्या अनुषंगाने असलेल्या मुद्यांची चौकशी करून 10 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश गौडा यांनी दिले आहेत.