नाशिकमध्ये 19 वर्षीय मुलीचा आढळला संशयास्पद मृतदेह; पोलिसांना घातपात केल्याचा संशय

crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नाशिकच्या (Nashik) पंचवटी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी नर्सिंग कॉलेजमध्ये शिकत असलेल्या एका 19 वर्षीय मुलीचा मृतदेह संशयितरित्या आढळून आला आहे. मंगळवारी सकाळच्या वेळी या मुलीचा मृतदेह रासबिहारी लिंकरोडवरील एका मोकळ्या जागेत पडलेला सापडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पंचवटी पोलिसांनी मुलीच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. तसेच या सर्व घटनेचा तपास सुरू केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रियंका विरजी वसावे असे मृतदेह सापडलेल्या मुलीचे नाव आहे. प्रियंका औरंगाबाद नाक्यावरील एका नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. मात्र, मंगळवारी प्रियांका मृतावस्थेत रासबिहारी लिंकरोडवरील मिरद्वार लॉन्स शेजारील मोकळ्या जागेत आढळून आली. सुरुवातीला हा मृतदेह नेमका कोणाचा आहे हे कोणालाच ओळखू आले नाही. मात्र पोलिसांनी घटनास्थळी येऊन मुतदेहाची पटवली. यानंतर ती प्रियांकाच असल्याचे स्पष्ट झाले.

सध्या पोलिसांनी या सर्व घटनेची पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करून घेतली आहे. तसेच घटनेचा पंचनामा केला आहे. पोलिसांना संशय आहे की, प्रियंकाची कोणत्यातरी टोकाच्या कारणावरून हत्या करण्यात आली आहे. कारण, प्रियंकाच्या शरीरावर दोरीने गळा आवळ्याच्या आणि हातावर काही जखमा असल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. दरम्यान, या सर्व घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच प्रियंकाच्या हत्येसंदर्भात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहे.