हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्तापर्यंत तुम्ही हवेत उडणारी गाडी फक्त टीव्ही किंवा मोबाईल गेम मध्ये बघितलं असेल. परंतु जर हे चित्र प्रत्यक्षात साकार झालं तर ? असा विचार कधी तुमच्या मनात आलाय का? होय, आता तुमचं हे स्वप्नही लवकरच साकार होईल. जपानच्या सुझुकी मोटर्स या कंपनीने स्काय ड्राईव्ह सोबत फ्लाईंग कार बनवण्यासाठी पार्टनरशिप केली आहे. त्याबद्दल माहिती पॅरिस ऑटोशोमध्ये या दोन्ही कंपनीने दिली. ही फ्लाईंग कार मध्य जपान मधील सुझुकी मोटरच्या प्लांटमध्ये मॅन्युफॅक्चर करण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी स्प्रिंग मध्ये या कारचं प्रोडक्शन करण्यात येईल.
दोन्ही कंपन्यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये फ्लाइंग कारचे संशोधन, विकास आणि मार्केटिंगसाठी करार केला होता. स्कायड्राईव्ह उडत्या कारच्या निर्मितीसाठी संपूर्ण सेटअप तयार करेल आणि सुझुकी उत्पादन तयारीसाठी मदत करेल. सुझुकी मोटर्स नवीन अनुभवासाठी ऑटोमोबाईल, दुचाकी, आउट बोर्ड मोटर्स, आणि मोबिलिटी व्यवसायात प्रवेश करणार आहे. बऱ्याच कंपन्या फ्लाईंग कार बनवण्यासाठी प्रयत्न, विकास संशोधन करत असून अनेक कंपन्यांनी या कारची मॉडेल्स देखील बनवले आहे. आता लवकरच काही कंपन्या या कारचं उत्पादन करण्यासाठी प्रयत्न करू शकतात. भविष्यात फ्लाईंग कारला जास्त वाव आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या फ्लाईंग कार कडे लागलेले आहे.
दरम्यान, फ्लाइंग कार ही संकल्पना गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. अजून प्रत्यक्षात ती साकार झालेली नाही, परंतु काही वर्षांपूर्वी हुंडाई कंपनीच्या युके बॉसने सांगितले की, अशी वाहने या दशकाच्या शेवटी प्रॅक्टिकल रियालिटी बनू शकतात. काही इंट्रासिटी एप्लीकेशन पाहिले तर ते कार्गो साठी, अर्बन एयर मोबिलिटी आणि पॅसेंजर साठी शक्य आहे. पण हे सर्व या दशकाच्या अखेरीस शक्य होईल आणि ते खूप कमी प्रमाणात असेल.