व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

दर्शना पवार हत्या प्रकरणी राहुल हंडोरेला अटक; खुनाचं धक्कादायक कारण समोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमपीएससी मध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळवलेल्या दर्शना पवार (Darshana Pawar) मृत्यू प्रकरणी पोलिसाना मोठं यश मिळालं आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी चार दिवसांपूर्वी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता, परंतु ज्या मित्रासोबत ती राजगडावर गेली होती त्या राहुल हंडोरेला (Rahul Handore) पोलिसांनी अटक केली आहे. दर्शनाच्या मृत्यूनंतर राहुल गायबच होता, अखेर पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधत त्याला ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे दर्शनाच्या मृत्यूचं गूढ आता उकलण्याची शक्यता आहे.

आरोपी राहुल हंडोरे याला पुणे पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. लग्नाला नकार मिळाल्याने राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दर्शना पवार आणि राहुल हंडोरे हे एकमेकांचे दूरचे नातेवाईक आहेत, दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती, परंतु तिच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिला तसेच तिचं दुसरीकडेच लग्न ठरवलं होतं. यामुळेच राहुलने तिची हत्या केल्याचा संशय आहे. आज दुपारी पुणे पोलीस याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण माहिती देतील.

राहुल हंडोरे नेमका होता तरी कुठे-

दर्शनाच्या हत्येनंतर राहुल फरार होता. पुण्यातून गायब झाल्यानंतर त्याच लोकेशन दिल्ली येथील दाखवत होते, त्याठिकाणी त्याने एटीएम कार्डवरुन पैसे सुद्धा काढले, त्यानंतर त्याच पुढील लोकेशन कोलकाता दाखवत होत. तो सातत्याने आपलं लोकेशन बदलत होता, मात्र मुंबईत आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी राहुल हांडोरेला अटक केली.