सोलापूर | स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेे ऊसाची थकीत एफआरपी रक्कम व्याजासकट त्वरीत मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरावर मोर्चा काढला. परंतू मोर्चाला पोलीस परवानगी नसल्याचे कारण सांगून पोलीसांनी मोर्चेकरांना सात रस्ता परिसरात ताब्यात घेतले होते.
ताब्यात घेतलेल्या मोर्चेकर्यांना सोलापूर पोलीसांनी रेस्ट हाऊस येथे ठेवले. दरम्यान सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आंदोलकांशी फोनवरुन संपर्क साधुन पुढील चार दिवसात बील देण्याचे आश्वासन दिले. तसेच थकीत एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यास गाळप परवाने रोकण्याचा शब्द दिला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल, सिद्राम अब्दुलपूरकर, संघटक विजय रणदिवे, कार्याध्यक्ष शिवाजी पाटील, जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, जिल्हा कार्याध्यक्ष वसंत गायकवाड, पप्पू पाटील, इकबाल मुजावर, नवनाथ माने, किसान सभेचे शिवानंद झळके, सचिव उमाशंकर पाटील आदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.