Swadhar Yojana | सरकारने आजपर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना आणली आहे. त्यातही सर्वसामान्य नागरिकांना सगळ्या सुविधा पुरवल्या जातात. त्याचप्रमाणे अनेक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील सरकारने योजना आणलेल्या आहे. तसेच विद्यार्थ्यांना देखील चांगले शिक्षण घेता यावे. त्यांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी देखील सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत. आणि यातीलच एक योजना म्हणजे स्वाधार योजना. (Swadhar Yojana) ही योजना खास विद्यार्थ्यांसाठी सरकारने आणलेली आहे. या योजनेअंतर्गत सरकार विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करत असते. सरकारच्या या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 51 हजार रुपयांची मदत केली जाते. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. आता या योजनेची आपण संपूर्ण माहिती घेऊन जाणून घेऊया.
स्वाधार योजना काय आहे ? | Swadhar Yojana
ही स्वाधार योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. या योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असे देखील म्हणतात. अनेक विद्यार्थ्यांना त्यांची घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे संपूर्ण शिक्षण घेता येत नाही. त्यांना मध्येच शिक्षण सोडावे लागते. त्यामुळेच अशा गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे. म्हणून महाराष्ट्र शासनाने ही योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौध्द विद्यार्थ्यांना वस्तीगृह भत्ता इत्यादी खर्चासाठी 51 हजार रुपये सरकारकडून दिले जातात.
या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ?
सरकारच्या या स्वाधार योजनेचा लाभ ज्या विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. दहावी आणि बारावी नंतर कोणत्याही कोर्सला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना जर 60% पेक्षा जास्त मार्क्स असतील, तर या योजनेचा लाभ घेऊ शकतो. यासाठी संबंधित विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. तसेच स्वतःचे बँक अकाउंट देखील असावे. स्वाधार योजनेअंतर्गत सुरुवातीला बोर्डिंगच्या सुविधेसाठी 28 हजार रुपये दिले जातात. तसेच राहण्यासाठी 15 हजार रुपये दिले जातात. तसेच मेडिकल आणि इंजीनियरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त 5 हजार रुपये दिले जातात.
योजनेचा अर्ज कसा करायचा ? | Swadhar Yojana
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर होम पेजवर असलेला स्वाधार योजनेचा फॉर्म तुम्हाला डाऊनलोड करावा लागेल.
- त्यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये आवश्यक असणारी माहिती आणि कागदपत्र जोडावे लागतील. आणि ती माहिती जवळील समाज कल्याणच्या कार्यालयात जमा करावी लागेल