आता तरी मराठी शाळा जपा; एम आय एम विद्यार्थी आघाडीचे कुणाल खरात यांनी केली पालकमंत्र्यांकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | एम आय एम विद्यार्थी आघाडी तर्फे औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई साहेब यांना मराठी शाळा बंदन करण्यासाठी व 650 विद्यार्थी यांचा भविष्याचा प्रश्नसाठी घेराव घातला व निवेदन दिले. आज एम आय एम विद्यार्थी आघाडी तर्फे माईर्स एम आय टी पुणे संस्थेने औरंगाबाद येथील स्वामी विवेकानंद अकॅडमी प्राथमिक व माध्यमिक शाळा (मराठी माध्यम) शैक्षणिक वर्ष 2021-2022 पासून नियमबाह्य व बेकायदेशीर पद्धतीने शाळा बंद केली आहे.

यावर परत सर्व विद्यार्थ्यांचे टी.सी, मार्कशीट, देखील स्पिड पोस्टाने अचानक सर्वच्या सर्व 650 विद्यार्थ्यांना घरी पाठवले आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद भयभीत झाले आहेत. संस्था चालक व अनधिकृत मुख्याध्यापक श्री संतोष शिवराम दराडे यांनी पालक विध्यार्थी शिक्षक आणि शालेय शिक्षण विभाग कोणाचीही संमती व परवानगी न घेता हे गैरकृत्य घडवून आणला आहे.

हे सर्व संशयास्पद कार्य आहे. संचालक हे त्यांच्या फायद्यासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हित लक्षात न घेता त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून त्यांच्या भविष्य व जिवनासोबत कृरतेने खेळ खेळत आहेत.

यासंदर्भात औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील साहेब व डॉ कुणाल खरात (प्रदेश अध्यक्ष )यांनी  आज पालकमंत्री श्री सुभाष देसाई यांना मराठी शाळा बंद होत आहेत. त्यावर आपल्या सरकारने लक्ष घालून मराठी शाळा वाचवण्यासाठी प्रयत्नशील असायला हव. एकिकडे सर्व भारत देश आता सध्या हे कोविड संकटा सोबत लढतोय, या मानवी महामारी सोबत झुंतोय आहे. सर्व कार्यालये बंद आहेत. शाळा बंद आहेत.

अशा परिस्थितीत संस्था चालक मुख्याध्यापक पैंश्याच्या हव्यासा पाई पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यावर अन्याय करत आहेत.आमचा पक्ष जर मराठी मुद्दा घेऊन लढल्यास आपल्या सरकारला जनतेस सांभाळणं अवघड जाईल. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आश्वासन दिले की लवकरच संस्था चालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

यावेळी निवेदन देताना. काकासाहेब काकडे, राज कुलकर्णी, सिद्धार्थ नरवडे, बंकट भोसले, नवाज कुरेशी, अवेज शेख, उषा कुलकर्णी, बाबासाहेब काकडे इत्यादी पालक व सर्व कार्यरत शिक्षक उपस्थित होते..

Leave a Comment