Pune News : पुणेकरांसाठी खुषखबर!! लवकरच स्वारगेट ते शिवाजीनगर Metro धावणार

Pune Metro
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यात मेट्रो (Pune Metro) चालू झाल्यापासून अनेकांचा त्यास चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मेट्रोमध्ये मिळणाऱ्या सुविधा ह्या प्रवाश्यांना आकर्षित करत आहेत. आता पुन्हा एकदा मेट्रो नवीन सुविधा उपलब्ध करून देणार आहे. ती म्हणजे पुणे मेट्रो आता स्वारगेट ते शिवाजीनगर (Swargate To  Shivajinagar Metro) धावण्यासाठी मेट्रो स्थानकाचे काम जोमाने सुरु आहे. त्याचबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

मेट्रोचा दुसरा टप्पा प्रवाश्यांसाठी झाला खुला 

मेट्रोचा दुसरा टप्पा प्रवाश्यांसाठी खुला करण्यात आला आहे. रुबी हॉल ते रामवाडी स्थानकही नागरिकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट ह्या मार्गांवरील काम अपूर्ण आहे. त्यासाठी मेट्रोचे काम एकाचवेळी सुरु आहे. मेट्रोसाठी थांबा उभा करण्याची तयारी मेट्रोकडून सुरु आहे. स्वारगेट मेट्रो स्थानकाचे वरील 2 मजली बांधून पीएमपीएलच्या २० बस बसतील इतकं मोठा स्थानक बांधण्यात येईल असं वक्तव्य मेट्रो अधिकारी सोनावणे यांनी केले आहे.

स्वारगेट येथे उभे केले 5 स्थानक

स्वारगेट हे पुणे शहरातील असं ठिकाण आहे जिथे हजारो लोकांची गर्दी असते. तसेच जवळच एसटी बस स्टॅन्ड असल्यामुळे दूरवरून आलेल्या प्रवाश्यांना आपल्या ठिकाणी जाण्यासाठी हा थांबा इथे उभा करण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या इथे पाच स्थानक उभे करण्यात येत आहेत.

85% स्थानकाचे काम पूर्ण

मेट्रो थांब्याचे काम हे 85% पूर्ण झाले असून एलव्हीटेड ईमारत बांधकाम सुरु आहे. चार ते पाच मजली हे बांधकाम होणार असल्याची माहिते मेट्रो अधिकाऱ्यांनी दिली आहे. सोनावणे यांनी सांगितले की हे काम लवकरच पूर्ण केले जाणार असून पुढील काही काळात हे ठिकाण प्रवाश्यांसाठी खुले करण्यात येणार आहे.

स्थानकावर भेटतील ह्या सुविधा

मेट्रो थांबा हा 180 मी एवढा लांब आणि 24 मीटर एवढा रुंद असून सायकल, रिक्षा, दुचाकी आणि फूटपाथची व्यवस्था इथे उपलब्ध असणार आहे. तसेच वाताणाकुलीत लिफ्ट आणि सरकत्या 8 जिन्यांची सुविधा ह्यात उपलब्ध असणार आहे. त्यामुळे प्रवाशी हमखास मेट्रोकडे वळणार ह्याची अशा मेट्रोकडून व्यक्त केली जात आहे.