Hello Recipe| गोड पदार्थ म्हणले की आपल्या तोंडाला पाणी सुटते. त्यात तो पदार्थ दुधाचा असल्यास तर मग बोलायला नको. असाच एक पदार्थ आम्ही तुमच्यासाठी घेवून आलो आहोत.
खव्याचा गोड पराठा करण्याचे साहित्य
१.पेढा – १०० ग्रॅम
२.तांदूळ पीठ – अर्धी वाटी
३.साजूक तूप – ६ चमचे
४.खजूर, अक्रोड, पिस्त्याचे तुकडे
५.साखर – २ चमचे
६.दुधाची पावडर आणि मैदा प्रत्येकी अर्धा वाटी.
कृती –
पेढा, साखर, तूप, खजूर, अक्रोड पिस्त्याचे तुकडे एकत्र करून मिक्सर वर जाडसर वाटून घ्यावे. दुसरीकडे एका भांड्यात दुधाची पावडर, मैदा, तांदळाचे पीठ एकत्र करून पराठयासाठी मळून घ्यावे. मिक्सर मध्ये वाटलेले सारण मळलेल्या पिठात घालून पोळपाटावर लाटून घ्यावे गरम तव्यावर पराठा भाजून घ्यावा पराठा भाजत आल्यावर त्याला तूप लावा आणि गरम गरम पराठ्याचा आस्वाद घ्या.
हि रेसिपी चाखून झाल्यावर प्रतिक्रिया कळवायला विसरु नका बरं का, अशाच हटके पाककृती जाणून घेण्यासाठी तुमच्या हक्काच्या www. hellomaharashtra.com या ठिकाणाला भेट द्या.