धक्कादायक ! नाशिकच्या भावली धरणात बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये नाशिक मधील भावली धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडून (drowning) एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुनील सोनू सांगळे असे या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच रविवारी रात्री उशिरापर्यंत आपत्ती व्यवस्थापन टीमकडून या तरुणाचा पाण्यात शोध घेण्यात (drowning)आला. मात्र तो कुठेही आढळून आला नाही. रात्रीच्या आधांरात शोधकार्यात अडथळा येत असल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली होती. आज सकाळी पुन्हा आपत्ती व्यवस्थान पथकाकडून पोलिसांच्या मदतीने या तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. अखेर आज सकाळी सकळी 11 वाजता आपत्ती व्यवस्थापन विभागाला या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.

काय घडले नेमके ?
मृत सुनील सांगळे हा आपल्या मित्रासोबत पोहण्यासाठी भावली धरणाच्या बॅकवॉटर परिसरता गेला होता. दुर्दैवाने त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला (drowning) या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. या तरुणाचा रविवारी रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला. मात्र हा तरुण कुठेही आढळून आला नाही. अंधरामुळे बचाव कार्यात अडथळा येत असल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली. आज सकाळी पुन्हा या तरुणाचा शोध घेतला असता सकाळी अकराच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह एका लाकडाच्या कपारीमध्ये (drowning) आढळून आला.

या अगोदरदेखील आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात विठूरायाच्या दर्शनासाठी आलेल्या नागपुरातील दोघा मित्रांचा चंद्रभागा नदीत बुडून (drowning) दुर्दैवी मृत्यू झाला होता. सचिन शिवाजी कुंभारे आणि विजय सरदार अशी मृत पावलेल्या दोन तरुणांची नावे आहेत. हे दोघेही मित्र आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला गेले होते. मंदिरात दर्शनासाठी जाण्याअगोदर अंघोळ करावी म्हणून ते नदीत उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीत वाहून (drowning) गेले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर