व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कराडात मंडई परिसरात जमावाकडून तलवार हल्ला

कराड | येथील मंडईत परिसरात 10 ते 12 जणांच्या जमावाने राडा केला. यावेळी युवकांनी केलेल्या तलवार हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. संबंधिताला उपचारासाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज बुधवार (दि. 6) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कॉटेज हॉस्पिटलसह मंडई परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. आनिससाहब महबूब मसुरकर (वय -26, रा. कराड) असे जखमी युवकाचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड मंडई परिसरातील फिश मार्केटसमोर गाडी पार्क करण्याच्या कारणावरून किरकोळ वादावादी झाली. त्यानंतर काही जण हातात तलवारी घेऊन मंडईच्या दिशेने आले. त्यांच्या पाठीमागे मोठा जमाव होता. त्यातील काही युवकांनी फिश मार्केटमधील एका दुकानात घुसून मसुरकर याच्यावर तलवारीने वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

दरम्यान जखमीला उपचारासाठी त्वरित वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान मंडई परिसरात आणि वेणूताई चव्हाण रूग्णालय परिसरात युवकांनी गर्दी केली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मंडई परिसर व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय परिसरामध्ये बंदोबस्त वाढवला आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.