एकविरा देवीचं दर्शन घेऊन प्रवास करणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात, कारने 4 वेळा मारली पलटी

खंडाळा : हॅलो महाराष्ट्र – जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज सकाळी असाच एक अपघात या ठिकाणी घडला. लोणावळ्यातील एकवीरा देवीचे दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारने चार ते पाच वेळा पलटी मारली. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, खंडाळा आरपीटीएस साठे मिसळच्या अवघड वळणावर हा भीषण अपघात घडला आहे. आज सकाळी सुमारे 8 च्या दरम्यान हा अपघात घडला आहे. या कारमध्ये पाच ते सहा प्रवासी होते. हि कार भरधाव वेगामध्ये होती. वळणावर आल्यामुळे कारचालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि या कारने 3 ते 4 पलट्या खाल्ल्या.

सुदैवाने या कारमधील लोकांना कोणतीही इजा झाली नाही. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा अपघात घडला तेव्हा सुदैवाने मागे मोठे वाहन नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला. हि संपूर्ण घटना त्या रोडवर असलेल्या साठे मिसळ यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मागच्या महिन्यात याच वळणावर एका कंटेनर चा असाच अपघात झाला होता. त्यावेळी अपघातग्रस्त कंटेनरने प्रवासी रिक्षाला धडक दिली होती. या अपघतात रिक्षातील प्रवासी जखमी झाले होते.