Sydney Terrorist Attack : ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत दहशतवादी हल्ला; 16 ठार, 40 जखमी

Sydney Terrorist Attack
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलियातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध शहर असलेल्या सिडनीत दहशतवादी हल्ला झाला आहे. सिडनीच्या जवळ असलेल्या बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर ज्यू नागरिक सण साजरा करत असताना दोन हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात १६ जणांना जीव गमवावा लागला, तर ४० हुन अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या एकूण घटनेनं ऑस्ट्रेलिया हादरलं आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमकं काय घडलं ? Sydney Terrorist Attack

सिडनी शहरालगतच्या बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर ज्यू नागरिक सण साजरा करत असताना त्याठिकाणी २ हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्या वेळी बीचवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. सुटीचा दिवस असल्याने सकाळपासूनच पर्यटकांची संख्या वाढली होती. याचाच फायदा घेत पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या प्रतिकाराला एक हल्लेखोर ठार झाला, तर दुसऱ्या दहशतवाद्याला जखमी अवस्थेत अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या हल्लेखोराचे नाव नावीद अक्रम असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अहमद अल अहमद या फळविक्रेत्यानेही एका हल्लेखोराला विरोध केल्याचे समोर आले आहे.

हल्लेखोर काळ्या रंगाचे कपडे घालून बीचवर आले होते. त्यांच्या हातात सेमी-ऑटोमॅटिक रायफल असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा दहशतवादी हल्ला जाणून बुजून ज्यू समुदायाला लक्ष्य करून करण्यात आल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या हल्ल्याला धार्मिक रंग आला आहे. रविवारी बाँडी बीचवर हनुखा या ज्यू धर्मीयांच्या सणानिमित्त ‘चानुका बाय द सी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हनुखा हा दिव्यांचा सण असून तो आठ दिवस साजरा केला जातो. या कार्यक्रमासाठी जगभरातून ज्यू पर्यटक सिडनीत आले होते. त्याच क्षणी हा हल्ला करण्यात आला. Sydney Terrorist Attack

मायकल वॉन बचावला –

दरम्यान, इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉन या हल्ल्यात थोडक्यात बचावला. ज्या बीचवर हल्ला झाला, त्या हॉटेलमधेच मायकेल वॉन होता. मायकल वॉनने सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर करत लिहिलं, “बॉन्डीमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये लॉक होणं अत्यंत भीतीदायक होतं. सुदैवाने मी आता सुरक्षित घरी पोहोचलो आहे. आपत्कालीन सेवांचे आणि त्या धाडसी व्यक्तीचे आभार, ज्याने दहशतवाद्याचा सामना केला.