डायबिटीस झाल्यावर महिलांमध्ये दिसतात ‘ही’ लक्षणे; चुकूनही करू नका दुर्लक्ष

Diabetes
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि याबद्दल जीवनशैलीचा परिणाम त्यांच्या शरीरावर होताना दिसत आहे. आज काल डायबिटीस सारखा आजार अनेक लोकांना होत आहे. काही वर्षांपूर्वी केवळ म्हताऱ्या लोकांना डायबिटीस होत होता. परंतु आजकाल तरुण वैयक्तिक अनेक लोकांना डायबिटीस होत आहे. आणि लोकांना अनुवंशिकतेमुळे डायबिटीस होतो, तर काही लोकांना वाईट जीवनशैलीमुळे डायबिटीज होत असतो. परंतु या डायबिटीसकडे तर तुम्ही दुर्लक्ष केले, तर त्यामुळे हार्ट अटॅक यांसारख्या गंभीर आजारांना तुम्हाला सामोरे जावे लागते. तुम्हाला जर डायबिटीज झाला असेल, तर तुम्हाला सारखी तहान लागते. तुमचे वजन देखीलअचानक कमी होते. यांसारखी अनेक लक्षणे पुरुषांमध्ये दिसतात. परंतु महिलांमध्ये डायबिटीसची लक्षणे वेगळी दिसतात. त्यामुळे आज आपण कोणती लक्षणे दिसतात हे जाणून घेणार आहोत.

यीस्ट संसर्ग

हा एक त्वचा रोग आहे. ज्यावेळी यीस्टाचा संसर्ग होतो. तेव्हा रक्तातील साखर वाढते. आणि तुमच्या अंगाला देखील खूप जास्त खाज येते. अंगावर पांढरे ठिपके दिसतात. आणि त्वचा लाल पडते. महिलांमध्ये हा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

पॉलिसिस्टीक अंडाशय सिंड्रोम

पीसीओएस हा महिलांमध्ये होणाऱ्या सगळ्यांपैकी एक आहे. यामध्ये डायबिटीसची लक्षणे देखील असतात. यामुळे शरीरातील संतुलन बिघडते. आणि टाईप 2 डायबिटीस होऊ शकतो. यामुळे नियमितपणे मासिक पाळी येत नाही. आणि जास्त वजन वाढत राहते.

यूटीआय

महिलांना यूटीआय सारख्या संसर्गाचा धोका देखील अधिक असतो. यावेळी लघवीच्या वेळी जळजळ होते. वारंवार लघवी होते. तसेच मळमळ होते. यांसारखी लक्षणे असतात. यांसारखे लक्षणे असेल, तरी तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता असते.