T-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; पहा कुठे आणि कधी होणार सामने??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयसीसी कडून पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. . 16 ऑक्टोबर 2022 रोजी ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे, तर 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) अंतिम सामना होणार आहे.

T20 विश्वचषक 2022 मध्ये एकूण 45 सामने खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या 7 मैदानांवर होणार आहेत. अॅडलेडचं ओव्हल मैदान, गॅबा, कार्डिनिया पार्क, होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल, पर्थ, मेलबर्नचं एमसीजी आणि सिडनी क्रिकेट ग्राउंड या स्टेडियममध्ये 45 सामने होणार आहेत.

ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाचं पूर्ण वेळापत्रक जानेवारीमध्ये जाहीर करण्यात येणार आहे. तसेच तिकिटांची विक्रीही जानेवारीमध्येच सुरु होणार आहे. 2020 मध्येच ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक होणार होता. मात्र, कोरोना महामारीमुळे हा विश्वचषक 2022 मध्ये होत आहे.

काय असेल स्पर्धेचा कालावधी- 16 ऑक्टोबर पासून 13 नोव्हेंबरपर्यंत

स्पर्धेची ठिकाणं – अॅडिलेड,ब्रिसबेन, होबार्ट, मेलबर्न, पर्थ, सिडनी आणि गीलोंग

सुपर-12 मध्ये थेट प्रवेश मिळालेले संघ –ऑस्ट्रेलिया, न्यूजीलंड, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, दक्षिण अफ्रीका, अफगानिस्तान आणि बांग्लादेश