हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 16 ऑक्टोबरपासून T20 World Cup 2022 चे रणसंग्राम सुरू होणार आहे. यावेळी ऑस्ट्रेलियात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 8 संघांच्या कर्णधारांवर त्यांच्या देशातील चाहत्यांचे लक्ष असणार आहे. लोकप्रियतेबरोबरच हे कर्णधार अनेक जाहिरातींमध्येही दिसून येतात. चला तर मग आज आपण अव्वल 8 संघाच्या कर्णधारांच्या नेटवर्थबाबतची माहिती जाणून घेउयात…
रोहित शर्मा : टी-20 फॉरमॅट मधील सर्वोत्तम कर्णधारांपैकी रोहित शर्माचे नाव घेतले जाते. यासोबतच तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार देखील आहे. याव्यतिरिक्त तो भारतीय संघाच्या आघाडीच्या फलंदाजीचा प्राआधारस्तंभ देखील आहे. caknowledge.com च्या माहिती नुसार, या अनुभवी खेळाडूकडे सध्या जवळपास $24 मिलियन (INR 191 कोटी) ची संपत्ती आहे. तसेच रोहित हा Adidas, Maggi, Nissan, Lays, Oppo, Ceat, Aristocrat, Glenmark, IIFL Finance, Hublot आणि Highlanders यांसारख्या आघाडीच्या ब्रँडचा एम्बेसेडर आहे. यासोबतच तो आयपीएल आणि बीसीसीआयचा ए प्लस ग्रेड असलेला खेळाडू देखील आहे. T20 World Cup 2022
जोस बटलर : टी-20 फॉरमॅटमधील सर्वात स्फोटक फलंदाजांमध्ये इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरचे नाव सामील आहे. caknowledge.com च्या माहिती नुसार, जोस बटलरकडे एकूण $10 मिलियन (INR 79.7 कोटी) ची संपत्ती आहे. या 32 वर्षीय खेळाडूने आपल्या कारकिर्दीत जाहिराती आणि मॅच फीद्वारे आपली निव्वळ संपत्ती कमावली आहे. तसेच यष्टीरक्षक-फलंदाज असलेल्या जोस बटलरला IPL मधून 10 कोटी रुपये मिळतात. यासोबतच तो कूकाबुरा, कूपर असोसिएट्स, कॅस्टर, ओप्पो, ड्रीम इलेव्हन सारख्या ब्रँडचा एम्बेसेडर देखील आहे. T20 World Cup 2022
केन विल्यमसन : न्यूझीलंडच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणल्या जाणाऱ्या केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली किवी संघाने 2021 ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली. याशिवाय त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने एकदिवसीय तसेच टी-20 विश्वचषकाचे उपविजेते देखील मिळवले आहे. Sportsunfold.com च्या माहिती नुसार, केन विल्यमसनची एकूण संपत्ती $8 मिलियन (INR 58 कोटी रुपये) आहे. त्याचे मुख्य उत्पन्न न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून आहे. तसेच कर्णधार असल्याने त्याला इतर खेळाडूंपेक्षा जास्त मानधन देखील दिले जाते. याशिवाय आयपीएलमधील करारातूनही त्याला 14 कोटी रुपये मिळतात. याशिवाय त्याच्याकडे Rokit, Powered, Asics, Seagram Royal Stag, Nicholson Auto सारखे ब्रँड देखील आहेत. T20 World Cup 2022
एरॉन फिंच : ऑस्ट्रेलियन कर्णधार असलेला एरॉन फिंच हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात स्फोटक सलामीवीरांपैकी एक मानला जातो. या 35 वर्षीय खेळाडूने नुकतेच क्रिकेटच्या एकदिवसीय फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र टी-20 विश्वचषक 2022 मध्ये तो ऑस्ट्रेलियाची धुरा सांभाळणार आहे. networthey.com च्या माहिती नुसार, एरॉन फिंचची एकूण संपत्ती $10 मिलियन (INR 78 कोटी रुपये) आहे. त्याच्याकडे ग्रे-निकोल, प्यूमा, Asics, Callaway Golf, Sony PlayStation आणि Rario NFT सारखे टॉप ब्रँड्स देखील आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबतच्या कराराव्यतिरिक्त, आयपीएल आणि बीबीएल सारख्या फ्रँचायझी लीग त्याच्या कमाईत भर घालतात. T20 World Cup 2022
मोहम्मद नबी : अफगाणिस्तानचा कर्णधार असलेल्या मोहम्मद नबीकडे टी-20 विश्वचषक 2021 मध्ये कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तेव्हापासून हा अनुभवी अष्टपैलू खेळाडू अफगाण संघाला पुढे नेत आहे. हा 37 वर्षीय खेळाडू अफगाणिस्तानच्या प्रसिद्ध ब्रँड्स अजीझी आणि एटिसाल्टचा एम्बेसेडर देखील आहे. popularbio.com च्या माहिती नुसार, नबीची एकूण संपत्ती $1.5 मिलियन (INR 12 कोटी रुपये) आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डासोबतच्या कराराव्यतिरिक्त हा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आयपीएलमधूनही कमाई करतो. T20 World Cup 2022
बाबर आझम : पाकिस्तानचा कर्णधार असलेला बाबर आझम क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये जोमाने धावा करतो आहे. गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील ठरला होता. पाकिस्तानमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी बाबर आझम हा एक आहे. gqindia.com च्या माहिती नुसार या 27 वर्षीय खेळाडूची एकूण संपत्ती 32 कोटी रुपये आहे. त्याच्या केंद्रीय कराराव्यतिरिक्त, बाबरला पीएसएलमधील कराची किंग्जसोबतच्या त्याच्या करारातून 1.24 कोटी रुपये मिळाले. सध्या बाबरकडे हेड अँड शोल्डर्स, ओप्पो, एचबीएल, हुआवेई, फ्री फायर, ग्रे निकोल्स आणि क्रेडिट बुक सारखे टॉप ब्रँड देखील आहेत. T20 World Cup 2022
शाकिब अल हसन : अष्टपैलू खेळाडू असलेला शकिब अल हसन हा बांगलादेशचा कर्णधार आहे. सलग तीन वेळा आयसीसीचा अव्वल खेळाडू ठरलेल्या 35 वर्षीय शाकिबची एकूण संपत्ती $22 मिलियन (INR177 कोटी) आहे. बांगलादेश क्रिकेटचा पोस्टर बॉय असलेल्या शाकिबकडे जो लेनोवो, ओप्पो, पेप्सी, कॅस्ट्रॉल, लाइफबॉय सारखे ब्रँडदेखील आहेत. T20 World Cup 2022
टेम्बा बावुमा : कर्णधार टेम्बा बावुमाकडे ज्यावेळी कर्णधारपद सोपवण्यात आले तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. कारण त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटची वाटचाल अडखळली होती, मात्र या 32 वर्षीय खेळाडूने चोख कामगिरी करत देशात क्रिकेटची पुनर्बांधणी केली. shstrendz.com च्या मते, Bavuma ची एकूण संपत्ती $5 मिलियन (INR 39.8 कोटी) आहे. बावुमा त्याचे बहुतांश उत्पन्न केंद्रीय आणि देशांतर्गत करारातून मिळवतात. तो स्पोर्ट्स फूटवेअर ब्रँड न्यू बॅलन्सचा ब्रँड एम्बेसेडर देखील आहे. T20 World Cup 2022
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.t20worldcup.com/
हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!
Share Market मध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण, FMCG-ऑटो सेक्टरमध्ये वाढ
Rupee Co-operative Bank ला आजपासून ठोकले जाणार टाळे
Bank FD : आता ‘या’ बँकेकडून FD वर मिळणार 7.70 टक्के व्याज, व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजचे नवीन दर तपासा