T20 World Cup 2024 : 1 जून 2024 पासून क्रिकेटप्रेमींना T20 विश्वचषक स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे. यंदाची T20 वर्ल्डकप स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिके आयोजित करण्यात येणार आहे. या विश्वचषक स्पर्धेत एकूण 9 वेगवेगळ्या शहरांमध्ये 55 सामने होणार आहे. क्रिकेटप्रेमी मोठया उत्साहाने T20 वर्ल्डकपकडे डोळे लावून बसले आहेत. त्यापूर्वी ICC ने सर्व संघाना एक महत्वपूर्ण सूचना दिलेल्या आहे. T20 विश्वचषक स्पर्धेसाठी 1 मे पर्यंत सर्व संघानी आपला संघ जाहीर असं असे ICC ने सांगितलं आहे.
काय आहेत ICC च्या सूचना – T20 World Cup 2024
सर्व संघांना 1 मे पर्यंत विश्वचषकासाठी (T20 World Cup 2024) त्यांचा संघ जाहीर करायचा आहे.
25 मे पर्यंत घोषित केलेला संघ बदलता येईल
वर्ल्डकप साठी प्रत्येक संघ केवळ 15 खेळाडू निवडू शकेल
स्पर्धेसाठी यजमान देशांत प्रवेश केल्यानंतर सर्व संघांना किमान 2 सराव सामने खेळावे लागतील.
T20 विश्वचषक स्पर्धेत पात्र ठरलेले 20 संघ कोणते –
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया आणि युगांडा.
4 गटात संघाची विभागणी
गट A – भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
गट B – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
गट C – न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
गट D – दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ