हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्यापासून म्हणेजच 2 जूनपासून T20 World Cup 2024 ला सुरुवात होणार आहे. अमेरिका विरुद्ध कॅनडा यांच्यातील सामन्याने विश्वचषकाचा श्रीगणेशा होणार आहे. अमेरिकेच्या भूमीवर पहिल्यांदाच विश्वचषक खेळवला जाणार आहे त्यामुळे एक वेगळी उत्सुकता या वर्ल्डकपकडे आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सुद्धा मोठ्या तयारीने अमेरिकेला रवाना झाला असून यंदा काहीही करून वर्ल्डकप जिंकायचाच असा चंग टीम इंडियाने बांधला आहे. यावर्षीची विश्वचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत असल्याने टीव्ही किंवा मोबाईलवर लाईव्ह सामना पाहयचा झाल्यास कधी बघावा असा प्रश्न प्रत्येक क्रिकेटप्रेमीला पडला असेल. परंतु चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला टीम इंडियाचे सामने कधी, कुठे आणि कोणाविरुद्ध होतील हे अगदी सविस्तर सांगणार आहोत.
यावेळी T-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2024) पहिल्या फेरीसाठी 20 संघांची प्रत्येकी ५ अशा चार गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघ सुपर-एटसाठी पात्र होण्यापूर्वी चार सामने खेळेल. प्रत्येक गटातील दोन संघ सुपर-8 मध्ये जातील तर तळाचे तीन संघ बाहेर पडतील. आता हे आठ संघ दोन वेगवेगळ्या गटात विभागले जातील. दोन्ही गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. बार्बाडोस येथे २९ जून रोजी अंतिम सामना होणार आहे. टीम इंडिया ग्रुप-A मध्ये आहे. या गटात भारताशिवाय, पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका आणि कॅनडाचा समावेश आहे. या संघाना हरवून भारताला सुपर-8 मध्ये जावे लागेल.
भारताचे सामने कधी आहेत? T20 World Cup 2024
5 जून- भारत vs आयर्लंड, नॅसो काउंटी स्टेडिअम, न्यूयॉर्क
9 जून- भारत vs पाकिस्तान, नॅसो काउंटी स्टेडिअम, न्यूयॉर्क
12 जून- भारत vs अमेरिका, नॅसो काउंटी स्टेडिअम, न्यूयॉर्क
15 जून- भारत vs कॅनडा, फोर्ट लॉडरहिल, फ्लोरिडा
टीम इंडिया सुपर-8 मध्ये गेली तर त्यांचे शेड्युल पुढीलप्रमाणे असेल
20 जून- भारत vs C-1, ब्रिजटाउन, बार्बाडोस
22 जून- भारत vs D-2, नॉर्थ साउंड, अँटीगा
24 जून- भारत vs B-2, ग्रोस आयलेट, सेंट लूसिया
असा आहे भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.