हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये T20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2024) सुरु होणार आहे. वर्ल्डकप म्हणजे क्रिकेटचा कुंभमेळा .. त्यामुळे प्रत्येकजण आवर्जून विश्वचषक स्पर्धेचे सामने बघत असतो. आता मोबाईल आणि टीव्ही वर T20 विश्वचषक स्पर्धेचे सामने पाहायचे असतील तर ते कुठे बघावे? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या मनात नक्कीच पडला असेल. मात्र चिंता करू नका आम्ही तुम्हाला अशा एका अँप बद्दल सांगणार आहोत ज्याठिकाणी तुम्ही अगदी फ्री मध्ये वर्ल्ड कपचे सामने बघू शकता…
भारतात सध्या आयपीएल अंतिम टप्प्यात आली आहे. आयपीएलचे सामने तुम्ही जिओ सिनेमा अँपवर मोफत मध्ये बघितले असतील यात शंकाच नाही. परंतु वर्ल्डकपचे सामने तुम्ही जिओ सिनेमावरून मोफत मध्ये बघू शकणार नाही. जिओ सिनेमा ऐवजी तुम्ही डिस्ने हॉट स्टारवरून विश्वचषक स्पर्धेचे सर्व सामने लाईव्ह मध्ये पाहू शकता. यासाठी तुम्हाला एक रुपया सुद्धा खर्च करण्याची आवश्यकता नाही. 15 मे रोजी डिस्ने हॉट स्टारने घोषणा केली होती की, वर्ल्ड कपचे सर्व सामने अगदी मोफत पाहण्यासाठी उपलब्ध असतील. म्हणजेच यासाठी तुम्हाला काहीही पैसे द्यावे लागणार नाहीत. याचाच अर्थ, मोबाईल मध्ये डिस्ने हॉट स्टार डाउनलोड करून वर्ल्डकपचा आनंद लुटू शकता.
किती वाजता सुरु होणार सामने – T20 World Cup 2024
यंदाची T20 विश्वचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार असल्याने भारतीय वेळ आणि तेथील वेळ यात खूप फरक पाहायला मिळेल. भारतात वर्ल्डकपचे काही सामने सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होतील, तर काही सामने संध्याकाळी 8 वाजता सुरू होतील. परंतु क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बाब म्हणजे भारतीय क्रिकेट संघाच्या मॅचेस संध्याकाळीच होतील. जर टीम इंडिया सेमीफायनल किंवा फायनलमध्ये पोहोचली तर मॅच सुरू होण्याची वेळ बदलली जाईल. हे अपडेट नंतर केले जाईल. भारत 1 जून रोजी बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर 2024 च्या T20 विश्वचषकाचा रोमांचक प्रवास सुरू होईल.
भारताचे सामने कधी?
2024 च्या T20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2024) भारतीय संघाला A गटात ठेवण्यात आले आहे. टीम इंडियाच्या गटात पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका आणि कॅनडा या संघांचा समावेश आहे. भारतीय संघ 5 जूनपासून आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. यानंतर टीम इंडिया 9 जूनला पाकिस्तानविरुद्ध लढेल. त्याचवेळी 12 जूनला अमेरिकेशी आणि 15 जूनला कॅनडाचा टीम इंडियाचा सामना होईल. भारताचा संघ पहिले तीन सामने न्यूयॉर्कमध्ये खेळणार आहे. तर ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना फ्लोरिडामध्ये होणार आहे, त्यानंतर टीम सुपर एट सामन्यांसाठी वेस्ट इंडिजला जाईल.