सातारा । सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुक्याच्या हद्दीतून ६ महिन्या करता तडीपार करण्यात आलेल्या दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने कराड एसटी स्टँड परिसरातून अटक केली. प्रतिक विजय साठे (वय- 28) व बजरंग उर्फ बजा सुरेश माने (वय- 27 दोघेही रा. बुधवार पेठ कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना आपल्या गोपनीय बातमीदार मार्फत सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यांतून तडीपार करण्यात आलेला प्रतिक साठे व बजरंग माने हा गुन्हेगार एसटी स्टँड परिसरात फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली. या गुन्हेगाराना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पथकाने एसटी स्टँड परिसरात सापळा लावून दोघांनाही ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक सातारा यांची सातारा जिल्हा देण्याची परवानगी आहे काय याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे ती परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले. या दोन्ही गुन्हेगारांना 10 जून रोजी रात्री साडेनऊ वाजता ताब्यात घेऊन त्यांच्यावर कराड शहर पोलिस ठाण्यांमध्ये पोलीस अधिनियम 142 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिस हवालदार साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, अमोल माने, मयूर देशमुख मोहसीन मोमिन प्रवीण पवार केतन शिंदे गणेश कचरे यांनी कारवाईत भाग घेतला.