अंबरनाथमध्ये चोरटयांनी दुधाचे ट्रे पळवले, CCTV फुटेज आले समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अंबरनाथ : हॅलो महाराष्ट्र – अंबरनाथमध्ये दूध चोरीचे (Milk theft) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अंबरनाथ पूर्वेत गेल्या 10 दिवसात दूध चोरीच्या (Milk theft) 3 घटना घडल्या असून यापैकी एक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अंबरनाथ शहरातील दूध विक्रेत्यांना दुधाच्या पिशव्या देण्यासाठी मध्यरात्रीच्या वेळी ट्रक येतो. हा ट्रक ठराविक ठिकाणी दुधाचे ट्रे उतरवून पुढे निघून जातो. त्यानंतर पहाटेच्या सुमारास दूध विक्रेते येऊन हे दूध घरोघरी वितरित करतात. दरम्यानच्या काळात ट्रे उतरवल्यापासून तिथे दूधविक्रेते लगेच येत नसल्याचे पाहून चोरट्यांनी दूध चोरी (Milk theft) करायला सुरुवात केली.

काय आहे नेमके प्रकरण ?
अंबरनाथ पूर्वेच्या शिवाजीनगर परिसरात समीर सावंत यांची विघ्नहर डेअरी आहे. या डेअरीच्या बाहेर असेच उतरवण्यात आलेले दुधाचे तीन ट्रे 2 जून रोजी पहाटेच्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी पळवले होते. यानंतर 3 जून रोजी दुधाचे 7 ट्रे, तर 11 जून रोजी दुधाचे 9 ट्रे चोरून नेण्यात आले. यापैकी 2 तारखेची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये दुचाकीवरून आलेले दोन जण दुधाचे ट्रे उचलून घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज शिवाजीनगर पोलिसांना सुद्धा देण्यात आले मात्र त्यांनी गुन्हा दाखल करून घेण्यात स्वारस्य न दाखवता तपास करून सांगतो, असे उत्तर दिले. त्यामुळे लोकांनी या घटनांकडे किरकोळ बाब म्हणून दुर्लक्ष न करता या चोरट्यांना पकडून अद्दल घडवण्याची मागणी केली आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे ?
या व्हिडिओमध्ये दोन जण बाईकवरून येताना दिसत आहेत. दुधाचे ट्रेक रस्त्याच्या कडेला एकावर एक ठेवण्यात आलेले आहेत. बाईकवर येताच दोघे दुधाच्या ट्रे शेजारी थांबतात. त्यानंतर दुचाकीवर मागे बसलेला एक जण उतरतो. एकएक करुन ट्रे काढतो आणि थेट बाईकवर ठेवतो. एकूण तीन ट्रे काढून घेतल्यानंतर (Milk theft) तो पुन्हा बाईकवर बसतो आणि ते शांतपणे निघून जातात. पहाटे चार साडे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हे पण वाचा :
जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा चकमक! लष्कर ए तोयबाचे 3 अतिरेकी ठार

काळाचा घाला! डॉक्टरांकडे उपचारांसाठी जात असताना सख्ख्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू

हँडल न पकडता रस्त्याच्या मधोमध चालवत होता बाइक; स्टंट पाहून तुम्ही थक्क व्हाल

IND vs SA T-20 : क्रिकेट मॅचच्या दरम्यान स्टेडिअममध्येच एकमेकांबरोबर भिडले फॅन्स

शिवसेनेच्या राज्यसभेतील पराभवामागे राष्ट्रवादीचेच षडयंत्र; भाजपच्या ‘या’ खासदाराने केले मोठे विधान

Leave a Comment