आर्थिक संकटात आहात? तुम्हाला मिळू शकेल covid-१९ पर्सनल लोन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटात संचारबंदीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे बरेचजण आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा नागरिकांसाठी आता काही बँकांनी covid-१९ पर्सनल लोनची सोय उपलब्ध केली आहे. अत्यंत कमी व्याजदरात हे लोन मिळू शकणार आहे. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया … Read more

करोनामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार तेव्हा तयार राहा! शरद पवारांचे भाकित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे देशासमोर मोठं आर्थिक संकट आलं आहे. त्यामुळं पुढचे काही महीने आपल्याला भरपूर काटकसर करावी लागणार आहे, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे आज संवाद साधला. करोनाचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळं वायफळ खर्चाला कात्री लावावी लागणार आहे. नगर … Read more

कोरोना नाही तर ‘या’ कारणामुळे बँका पुढच्या आठवड्यात चार दिवस बंद

दिल्ली | संप आणि सुट्ट्या यांच्यामुळे पुढील आठवड्यात बँका केवळ तीनच दिवस सुरु राहणार आहेत. १० पीएसयू बँकांच्या चार मोठ्या बँकांमध्ये मेगा विलीनीकरणाच्या योजनेचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना (AIBEA) आणि अखिल भारतीय बँक अधिकारी संघटनेने (AIBEO) २ मार्च रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. द बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियानेही सदर संपात … Read more

कोरोनाचा झटका, गुंतवणूकदारांना ६.२५ लाख कोटींचा फटका

मुंबई | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना ‘कोविड-१९’मुळे जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. आज सोमवारी गुंतवणूकदारांना ६.२५ लाख कोटींचा फटका बसला. मुंबई शेअर बाजारात आज सोमवारी सकाळच्या सत्रात सेन्सेक्स २ हजार १८२ अंकांनी कोसळला. अर्थव्यवस्थेवरील ‘कोविड-१९’चे सावट आणखी दाट होण्याची भीती गुंतवणूकदारांना आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेअरविक्री करण्यावर त्यांनी भर दिला. इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक … Read more

निराशाजनक! १६ लाख रोजगाराच्या संधी होणार कमी

मुंबई | देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना आता यंदाच्या वर्षी १६ लाख रोजगाराच्या संधी कमी होणार असल्याचे समोर आले आहे. बेरोजगारांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण असून याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम पडण्याची शक्यता आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाने केलेल्या एका पाहणीतून सदर माहिती समोर आली आहे. यंदाच्या वर्षी १६ लाख रोजगाराच्या संधी कमी होणार असल्याचे स्टेट … Read more

अरे बापरे! महागाईने गाठला मागील पाच वर्षांतला उच्चांक

मुंबई | सर्वसामन्यांसाठी निराशाजन बातमी आहे. महागाईने मागील पाच वर्षांतील उच्चांक गाठला आहे. महागाईची सरकारी आकडेवारी नुकतीच समोर आली असून महागाईने उच्चांक गाठल्याचे समजत आहे. महागाईच्या सरकारी आकडेवारीनुसार महागाई दर ७.३५ % वर पोहोचला आहे. भाज्यांचा दरात ६० % नी वाढ झाली आहे तर डाळी १५.४४% नी महागल्या आहेत. मांस आणि मासे ९ टक्क्यांनी महागले … Read more