चूक ती चूकच, उदयनराजेंकडून मुस्लिम समुदायाची माफी

 सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

लोकसभा पोटनिवडणूकीवेळी भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर सांगता सभेत यांनी मुस्लिम समुदायाला भडकवणारी आणि त्यांची निंदानालस्ती करणारी भाषा वापरल्यामुळे याचा फटका उदयनराजेंना निवडणुकीत बसला. वादग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लिम समाज कमालीचा दुखावला गेला होता.

निवडणूक निकालानंतर ही बातमी उदयनराजेंना समजल्यानंतर मुस्लिम समुदायाची माफी मागण्यासाठी आज पहिल्यांदाच कराडमध्ये गेले होते. विक्रम पावसकर यांना चांगलाच धडा शिकवा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. मी त्या ठिकाणी असतो तर पावसकरांना सभेतून खाली खेचलं असतं असं उदयनराजे म्हणाले. याशिवाय माझ्या प्रचारात त्यांना मी कोणताच रोल दिला नव्हता मात्र सांगता सभेत त्यांनी वादग्रस्त भाषण करून संपूर्ण कामावर विरजण घातलं असंही उदयनराजे पुढे म्हणाले.

श्रीनिवास पाटील यांचा नावलौकिक वाढेल असं काम सातरकरांनी करावं असंही उदयनराजे यावेळी म्हणाले. मी जर गुंड, मवाली असतो तर लोकांनी मला मुलासारखं सांभाळलं नसतं. माझ्याकडून झालेल्या चुकांची मी माफी मागतो असं म्हणत अधिक चांगलं काम करण्यासाठी मला ताकद द्या असं भावनिक आवाहनही उदयनराजे यांनी यावेळी केलं.

पहा विडिओ- 

चूक ती चूकच, उदयनराजेंकडून मुस्लिम समुदायाची माफी

आदरणीय पाटील साहेब जिंकले हे खरं आहे, पण लोकसेवा काय केली?- उदयनराजे भोसले

सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला. अतिशय प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत साताकर मतदारांनी श्रीनिवास पाटील यांना पसंती देत मोठ्या मताधिक्क्याने त्यांना निवडून दिले. मात्र, उदयनराजेंना हा पराभव जिव्हारी लागल्याचे आता दिसत आहे.

‘ज्याने मोठं केलं त्यालाच उदयनराजे विसरले’; श्रीनिवास पाटील यांची निकालानंतरची प्रतिक्रिया

सातारा लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपच्या उदयनराजे भोसले यांचा दणदणीत पराभव करत श्रीनिवास पाटील विजयी झाले आहेत. हा जनतेच्या विश्वासाचा आणि प्रेमाचा विजय असून ज्या व्यक्तीने आपल्याला मोठं केलं त्या व्यक्तीलाच उदयनराजे विसरले, आणि याचाच फटका त्यांना बसला असल्याचं श्रीनिवास पाटील म्हणाले.

कागदावर लिहीलेलं भाषण वाचून उदयनराजेंचे शरद पवारांना अडखळत प्रत्युत्तर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारचा दिवस शेवटचा आहे. अनेक पक्षांनी वेगवेगळ्या पद्धती वापरून मतदारांवर आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सातारा जिल्ह्यात विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक सुद्धा होत आहे. उदयनराजे विरुद्ध श्रीनिवास पाटील अशी लढत या ठिकाणी चांगलीच रंग पकडत असल्याचं पहायला मिळत आहे. आज कराड येथे प्रचाराच्या सांगता सभेत मात्र उदयनराजे काहीसे चिंतीत अवस्थेत पहायला मिळाले.

साताऱ्यात शुक्रवारी भरपावसात शरद पवारांनी घेतलेल्या सभेचा चांगलाच परिणाम राज्यभर पहायला मिळाला. आता उदयनराजे भोसले यांनी कागदावर लिहीलेलं भाषण वाचून शरद पवारांना अडखळत प्रत्युत्तर दिलंय. २०१९ च्या लोकसभेसाठी उदयनराजेंना तिकीट देऊन मी चूक केल्याचं शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यासाठी उदयनराजे यांनी भाषण लिहून आणलं होतं. हे भाषण वाचतानाही उदयनराजे कमालीचं अडखळत असल्याचं पहायला मिळालं. शरद पवारांवर नेमकी काय टीका करावी हेच त्यांना समजत नसल्याचं एकूण भाषणावरून स्पष्टपणे जाणवून येत होतं.

भाषणाच्या शेवटी त्यांनीच माझ्या मोडक्या तोडक्या भाषणातून तुम्हाला जे कळालं त्यावर तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला आणि अतुल भोसलेंना साथ द्या. भाजपच्या विकासाला साथ द्या असं भावनिक आवाहन उदयनराजे यांनी शेवटी केलं.

शरद पवारांना प्रत्युत्तर देताना उदयनराजे अडखळले

मोदी-शहांच्या सभांचा चांगला परिणाम होतोय – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची आज सातारा येथे प्रचार सभा पार पडली. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आलेल्या मोदी यांनी यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीवर कडाडून टीका केलीय. मात्र आता राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मोदी, शहा यांच्या प्रचार सभांचा चागला परिणाम होत असल्याचं म्हणालेत. पंतप्रधान नरेंन्द्र मोदी आणि अमित शहा जितक्या सभा घेतील … Read more

गडकिल्यांवर लग्न सोहळ्याप्रकरणी उदयनराजेंचा खुलासा

‘मला काय वेड लागले आहे का गड किल्यावर डांन्सबार सुरु करा असं सांगायला. असा विचार करण्यापेक्षा मला मेलेले परवडले. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे आणि यातून माझे चारित्र्यहनन केले’ असा आरोप सातारा लोकसभा पोटनिवडणूकीच्या रिंगणात उभे असलेले उदयनराजे भोसले यांनी केला.

उदयनराजे २ लाख मतांनी पडणार; पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी

उदयनराजे भोसले लोकसभा पोटनिवडणुकीत २ लाख मतांनी पराभूत होणार आहेत असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

अतुल भोसलेंना एकदा आमदार तर करा मी त्यांना महाराष्ट्राचा नेता बनवेल – अमित शहा

‘अतुल भोसले ना एकदा आमदार करा मी त्यांना महाराष्ट्राचा नेता करेन’ असे ठोस आश्वासन केंद्रीय गृहमंत्री तसेच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी कराड येथे दिले. सातारा लोकसभा पोटनिवडणुक आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या जाहीर प्रचार सभेत शहा बोलत होते. यावेळी दोन्ही मतदारसंघांचे उमेदवार उदयनराजे आणि अतुल भोसले यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याची अमित शहा यांनी उपस्थित लोकांना विनंती केली.

आदित्यला उदयनराजेंची ‘जादू की झप्पी’

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज साताऱ्यातील पाटणमध्ये जाहीर सभा घेतली. पाटण विधानसभेचे शिवसेना उमेदवार शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ ही सभा झाली. यावेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले माजी खासदार उदयनराजे भोसलेही मंचावर उपस्थित होते. यावेळी उदयनराजे भोसले मंचावर आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. मात्र त्याचवेळी उदयनराजेंनी पाया पडणाऱ्या आदित्य ठाकरेंना उठवत, त्यांना अलिंगन दिलं. उदयनराजेंनी आदित्यला एकप्रकारे जादू की झप्पीच दिली.

जेव्हा उदयनराजे आणि अतुल भोसलेंना पण काढावा लागतो वडापावावर दिवस

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रचाराला आता रंगत चढली आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उदयनराजेसुद्धा तयारीत असताना प्रचाराच्या घाई-गडबडीत दोन नेत्यांनी वडापाव खात आपली भूक भागवून घेतली.