गडकिल्यांवर लग्न सोहळ्याप्रकरणी उदयनराजेंचा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । ‘मला काय वेड लागले आहे का गड किल्यावर डांन्सबार सुरु करा असं सांगायला. असा विचार करण्यापेक्षा मला मेलेले परवडले. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे आणि यातून माझे चारित्र्यहनन केले’ असा आरोप सातारा लोकसभा पोटनिवडणूकीच्या रिंगणात उभे असलेले उदयनराजे भोसले यांनी केला.

गडकिल्यांवर लग्न सोहळ्यासाठी जागा दिली पाहिजे त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारेल अशी माहिती एका इंग्रजी माध्यमाला उदयनराजे भोसले यांनी दिली होती. ही माहिती प्रसिध्द झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांच्यावर राज्यभरातील शिवभक्तांकडून मोठी टिकेची झोड उठली.

मदन भोसले यांच्या प्रचारार्थ वाई येथे आलेल्या उदयनराजेंनी पदयात्रेनंतर तातडीची पत्रकार परिषद घेऊन या बाबतचा खुलासा केला. यावेळी त्यांनी संबधित इंग्रजी दैनिकावर आगपाखड करत संबधित दैनिक हे विरोधातील राजकिय नेत्यांशी संबधित असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी इतरही मुद्दयांना हात घातला.

Leave a Comment