EVM वर विश्वास नाही असं म्हणणार्‍या उदयनराजेंचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उदयनराजे भोसले यांनी शनिवारी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे. पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतलं. भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष श्री.@AmitShah, पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष @JPNadda, मुख्यमंत्री @Dev_Fadnavis, केंद्रीय मंत्री @RamdasAthawale, … Read more

स्वार्थासाठी राजीनामा देणार्‍या उदयनराजेंकडून निवडणूकीचा खर्च वसूल करावा..

सोलापूर प्रतिनिधी | उदयनराजे भोसले यांच्यासारख्या स्वार्थासाठी राजीनामा देणार्‍या लोकप्रतिनिधींकडून निवडणूक खर्च वसूल करून सहा वर्षे निवडणूक लढविण्यास मनाई करावी अशी मागणी पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते द्वेपायन वरखेडकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

उदयनराजेंनी भाजप प्रवेशासाठी ठेवल्या होत्या या दोन अटी ; भाजप पक्ष श्रेष्ठींनी हिरवा सिंग्नल देतात राजेंनी केली पक्षांतराची घोषणा

लोकसभेचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या स्वार्थासाठी खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक लादली जाणार आहे. यासाठी 20 ते 25 कोटी रुपये खर्च होणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला ही चाट लागणार आहे.

आमच्या बहिणीचा ८०० कोटींचा दारूचा कारखाना आहे : धनंजय मुंडे

यामुळे खासदार उदयनराजे भोसले व इतर लोकप्रतिनिधींनी निवडणुकीपूर्वी राजीनामा दिल्यास अशा उमेदवाराकडून निवडणुकीचा खर्च वसूल करून त्यांना सहा वर्षासाठी निवडणूक लढविण्यास मनाई करावी, अन्यथा त्यांचा राजीनामा स्वीकारू नये अशी मागणी पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते द्वेपायन वरखेडकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या –

शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजेंचा राष्ट्रवादीला रामराम

उदयनराजेंनी जाहीर केली भाजप प्रवेशाची तारीख ; ट्विटर वरून केली घोषणा

मुख्यमंत्र्यांना चितपट करण्यासाठी शरद पवार विधानसभेच्या मैदानात

तर शरद पवारांचे माढ्यात डीपॉझीट जप्त केले असते : जयसिंह मोहिते पाटील

पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपाच्या वाटेववर?

शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजेंचा राष्ट्रवादीला रामराम

सतारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या साताऱ्यात राष्ट्रवादीला गळती काय थांबता थांबत नाही . राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचा आशीर्वाद घेत अखेर राष्ट्रवादीला रामराम ठोकला असून १४ सप्टेंबरला दिल्लीत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांना चितपट करण्यासाठी शरद पवार विधानसभेच्या मैदानात गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीला सोडचिठी देण्याच्या मानसिकतेत असलेले सातारचे खासदार उदयनराजे … Read more

उदयनराजे कुठेही असतील, त्यांचे स्वागत करतो-छत्रपती संभाजीराजे

सोलापूर प्रतिनिधी | उदयनराजे कुठेही असतील त्यांचे स्वागत करतो, असे प्रतिपादन राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त सदस्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. सोलापूरात एका कार्यक्रमासाठी ते आले होते. विधानसभेच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून राज्यात नेत्यांची जोरदार पक्षांतरे सुरु आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीमधील अनेक वरीष्ठांनी भाजप व शिवसेनेत प्रवेश केला आहे. अजून कहीजण प्रवेशाच्या वाटेवर आहेत. खासदार उदयनराजेही राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार आहेत, अशी चर्चा आहे.

[youtube https://www.youtube.com/watch?v=LTcM4fNV_BU&w=560&h=315]

याबाबत खासदार छत्रपती संभाजीराजे यांना विचारले असता ते म्हणाले उयनराजे हे आमचे बंधू आहेत. ते कोठेही असले तरी त्यांचे स्वागत करतो. सध्याच्या पक्षांतराबाबत विचारले असता ते म्हणाले, मला राजकीय काही बोलायचे नाही. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीने काढलेल्या ‘शिवस्वराज्य’ यात्रेत उदयनराजे दिसले नाहीत. त्यातच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यंतरी भेट घेतली होती. त्यामुळे उदयनराजे यांच्या पक्षांतराबाबत वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनीही त्यांची भेट घेतली होती. उदयनराजे यांच्या राजकीय भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गड किल्ले भाड्याने देण्याबाबत आपला विरोध असल्याचे सांगत माझी भुमिका मी पेजवर स्पष्ट केली असल्याचे ते म्हणाले.

 

भिडे गुरुजी उदयनराजेंच्या भेटीला! राजकिय चर्चांना उधान

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. अशात आता संभाजी भिडे आणि उदयनराजे यांच्या भेटीमुळे राजकिय चर्चांना उधान आलं आहे. भिडे यांनी आज उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे जाऊन भेट घेतलीय. या भेटीत नक्की काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र … Read more

उदयनराजे भोसलेही भाजपच्या वाटेवर?

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. उदयनराजे भोसले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. याआधी उदयनराजेंचे बंधू आमदार शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवेंद्रराजे भाजपमध्ये गेल्यामुळे उदयनराजे अस्वस्थ असल्याचं बोललं … Read more

007 मधलं आता 7 जाणार अन् फक्त 00 राहणार – उद्धव ठाकरे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा लोकसभा मतदार संघ भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेंन्द्र पाटील आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यातील शाब्दिक चकमकिंमुळे चांगलाच चर्चेत आहे. आता कराड येथील जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट उदयनराजेंना चॅलेंज दिलंय. आता 007 मधील 7 जाणरंय आणि फक्त 00 राहणारंय असं म्हणत ठाकरे यांनी शिवसेनेचे … Read more

सातार्‍यात दलित मते उदयनराजेंच्या पारड्यात पडणार पण मराठा मतांचे विभाजन होणार…

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी देश पातळीवर अल्पसंख्यांक व दलित समाजावर होणार्‍या विविध अत्याचार व दिल्ली येथे संविधानाची प्रत जाळून सुद्धा मोदी सरकारने मौन धारण केले होते. याचा तीव्र निषेध मतदान यंत्रणाद्वारे दाखवून देण्यासाठी सातार्‍यातील राष्ट्रवादीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना पाठींबा देण्यासाठी दलित संघटनेमध्ये चढाओढ लागलेली आहे. तर दुसर्‍या बाजुला वंचित आघाडीने … Read more

या कारणामुळे उदयनराजेंनी घेतली शिवेंद्रराजेंची ‘पप्पी’

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी    आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसाला महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी त्यांची गळाभेट घेत शिवेंद्रराजेंच्या नावाच्या घोषणा दिल्या होत्या. नरेंद्र पाटील यांच्या या जादूच्या झप्पीनंतर रात्री उशिरा खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत गळाभेट घेतली आणि जादूची पप्पी दिली.    यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील शिवेंद्रराजेंना … Read more

कॉलर उडवायची टेंपररी स्टाईल करुन मला थांबायचे नाही, नरेंन्द्र पाटील यांचा उदयनराजेंना टोमणा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ‘माझी स्टाईल-बिईल नाही. कॉलर उडवायची टेंपररी स्टाईल करुन मला थांबायचे नसून परमनंट राहून लोकांचे काम करायचे आहे’ असे म्हणत शिवसेना-भाजप महायुतीचे लोकसभा उमेदवार नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर नाव न घेता टिका केली. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुणे, सांगली आणि कोल्हापूरचा मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास … Read more