Saturday, March 25, 2023

शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजेंचा राष्ट्रवादीला रामराम

- Advertisement -

सतारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या साताऱ्यात राष्ट्रवादीला गळती काय थांबता थांबत नाही . राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचा आशीर्वाद घेत अखेर राष्ट्रवादीला रामराम ठोकला असून १४ सप्टेंबरला दिल्लीत प्रवेश करणार आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांना चितपट करण्यासाठी शरद पवार विधानसभेच्या मैदानात

गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीला सोडचिठी देण्याच्या मानसिकतेत असलेले सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन तब्बल दोन तास चर्चा केली. या बैठकीमध्ये उद्यनराजेंची समजूत काढण्यात शरद पवार यशस्वी झाले असल्याची चर्चा राजकीय गोठात चांगलीच रंगली. मात्र बैठकीमध्ये उदयनराजेंनी शरद पवारांचा आशीर्वाद घेत सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपमध्ये जावं लागणार आहे. तुमच्या विषयी मनात आदर आहे. तुमचा आशीर्वाद सदैव राहू द्या असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांचा निरोप घेतला.

शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपच्या या नेत्याने केली आपल्या उमेदवारीची घोषणा

उदयनराजे भोसले यांच्या राजकीय भूमिकेबद्दल गेल्या काही दिवसापासून सातारा जिल्ह्यासह राज्यात मोठी राजकीय चर्चा रंगताना पाहायला मिळाली. उदयनराजे भाजप मध्ये प्रवेश करणार कि राष्ट्रवादीत राहणार? मात्र उदयनराजे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत १४ सप्टेंबरला दिल्ली मध्ये प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी ,केंदीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणार असून दुसऱ्या दिवशी १५ तारखेला साताऱ्यात येत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या महाजानदेश यात्रेत सामील होणार आहेत.

आमच्या बहिणीचा ८०० कोटींचा दारूचा कारखाना आहे : धनंजय मुंडे

उदयनराजेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत जरी भाजप मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असला तरी मात्र खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षातील विरोधाचा फटका बसला होता. मताधिक्य कमी झालं होत. असं असलं तरी मात्र आता होणाऱ्या पोटनिवडणुकीत सातारकर उदयनराजेंना साथ देतील का? अशी चर्चा सध्या राजकीय गोटात होत आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या –

स्वार्थासाठी राजीनामा देणार्‍या उदयनराजेंकडून निवडणूकीचा खर्च वसूल करावा..

उदयनराजेंनी जाहीर केली भाजप प्रवेशाची तारीख ; ट्विटर वरून केली घोषणा

मुख्यमंत्र्यांना चितपट करण्यासाठी शरद पवार विधानसभेच्या मैदानात

तर शरद पवारांचे माढ्यात डीपॉझीट जप्त केले असते : जयसिंह मोहिते पाटील

पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपाच्या वाटेववर?