तर आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!

मुंबई | सध्या राज्यावर कोरोनाचे संकट आले आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास १० हजार वर पोहोचली आहे. अशात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदच धोक्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे यांच्या आमदारकी निवडीबाबत अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही. विरोधीपक्ष या संधीचा योग्य फायदा उठवून राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले … Read more

न्या. दीपांकर दत्ता यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई | कोलकाता उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. सायंकाळी मुंबईतील राजभवन येथे निवडक लोकांच्या उपस्थितीत झालेल्या छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना पदाची शपथ दिली. राज्याचे मुख्य सचिव अजेय मेहता यांनी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखविली. … Read more

देव मंदिरात नाही तर डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचाऱ्यांत आहे – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई । आज अक्षयतृतीयाचा सण असूनही सर्व बाजारपेठ ओस आहेत. देशभरातील लॉकडाउनमुळे सर्व मंदिरं बंद आहेत. आज देव मंदिरात नाही तर डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी यांच्यात आहे. तेव्हा कोणीही प्रार्थना करण्यासाठी घराबाहेर पडू नका असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना घरातच जे काही असेल ते करण्याचे आवाहन केले. अक्षयतृतीयेनियमित्त ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या … Read more

..तर मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे ‘हा’ दुसरा पर्याय आहे- छगन भुजबळ

मुंबई । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र, राज्याचे राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी त्यावर अद्यापही कार्यवाही न करत निर्णय घेतला नाही. जर वेळेत हा निर्णय झाला नाही, तर काय? असा प्रश्न सध्या चर्चेत आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना … Read more

माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे आजी मुख्यमंत्री ठाकरेंना खास पत्र! केल्या ‘या’ विशेष सुचना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनापासून खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने लॉकडाऊन ३ में पर्यंत वाढवला आहे. तरीसुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा बघता लॉकडाऊन कधी संपेल किंवा किती वाढविला जायील याबद्दल सर्वच साशंक आहेत. अश्या परिस्थितीत राज्यातील काही महत्वाचे घटक आहेत कि ज्यांचा रोजी रोटीचा प्रश्न आहे. अश्यांना राज्य सरकारतर्फे काही मदत व्हावी तसेच कोरोनाच्या अनुषंगाने … Read more

घरात बसून गोट्या खेळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राची वाट लावतोय – राणे

रत्नागिरी प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या देशात १८ हजार ६०१ कोरोनाबाधित आहेत तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ६७६ वर पोहोचली आहे. यापार्श्वभुमीवर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. घरात बसून गोट्या खेळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राची वाट लावतोय असं वक्तव्य राणे यांनी केले आहे. कोरोना … Read more

राज्यात आजपासून काय सुरु राहणार?

मुंबई | देशभरातील संचारबंदी १९ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल रोजी घेतल्यानंतर देशभरात पुन्हा अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं होतं. यावर राज्य सरकारांनी काही ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा विचार केला आहे. कोरोनाच्या जिल्हानिहाय प्रादुर्भावाचा विचार करुन राज्यात ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन निश्चित करण्यात आले आहेत. यातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील काही … Read more

भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना दिलासा, सीएम ठाकरेंनी घेतला ‘हा’ खास निर्णय

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २ हजार पार गेली आहे. लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. राज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक खास निर्णय घेतला आहे. एका परिपत्रकाद्वारे मुख्यमंत्रांनी सर्व घरमालकांना काही सूचना केल्या आहेत. 🚨राज्यातील घरमालकांना महत्त्वाची सूचना🚨 https://t.co/hXWG3ogNpJ — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 17, 2020 घरभाडे वसुली तीन … Read more

म्हणुन मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करणार्‍या कंगनाच्या बहिणीचे ट्विटर अकाऊंट झाले बंद

मुंबई | ट्विटरचे नियम मोडल्याने अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेल हिचे ट्विटर अकाऊंट काही वेळासाठी बंद करण्यात आले आहे. ट्विटरने ही कारवाई केली आहे. रंगोली चंडेल ही ट्विटरवर नेहमीच वादग्रस्त कारणासाठी चर्चेत राहिली आहे. मात्र ती आपल्या ट्विट्सद्वारे द्वेष पसरवत असल्याने ट्विटरने तिचे अकाऊंट बंद केले आहे. कंगना जरी सोशल मीडियावर सक्रिय नसली तरी … Read more

हिंमत व तयारी असेल तर सोबत या, आपली महाराष्ट्राला गरज आहे! – उद्धव ठाकरे

मुंबई । राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सध्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ हजार पार गेली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य सेवासंबंधी कोर्स झालेल्यांची आज महाराष्ट्राला गरज असल्याचे म्हटले आहे. जर तुम्ही याआधी आरोग्य सेवेत होता मात्र आता निवृत्त झाला आहात, किंवा रिक्त पदे नसल्याने तुमच्याकडे नोकरी न्हवती तर आता अशांनी … Read more