औरंगाबाद मध्ये कोरोनाचा विस्फोट सुरूच ; 1432 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 810 जणांना (मनपा 648, ग्रामीण 162) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 54866 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1432 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 67354 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1419 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 11069 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. … Read more

लॉकडाऊनदरम्यान शहरातील विविध भागांत शुकशुकाट

aurangabad Lockdown

औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या वतीने ११ मार्चपासून शहरात अंशतः लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ४ एप्रिलपर्यंत प्रत्येक शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. आज या लॉकडाऊनच्या दुसऱ्या आठवडा असून शहरात सगळीकडे शांतता दिसली. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडी, पैठणगेट व औरंगपुरा … Read more

औरंगाबाद जिल्ह्याची चिंता वाढली; दिवसभरात कोरोनाचे 1251 रुग्ण वाढले

औरंगाबाद, दि.१९ :  औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात 1251 कोरोनाच्या रुग्णांची भर पडल्याने चिंता आणखी वाढली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा हा 64243 वर जाऊन पोहचला आहे. औरंगाबाद शहरात 380 तर ग्रामीण भागात 79 अशा एकूण 459 जणांना सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 53498 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत एकूण 1388 जणांचा मृत्यू … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात टास्कफोर्सची बैठक ; रात्री 8 पासून सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी

collector office

औरंगाबाद : जिल्ह्यात सध्या अंशतः लॉकडाऊन सुरु आहे. हॉटेल, रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहे. भोजनाची पार्सल सुविधा सुरु आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने परिस्थिती गंभीर होत असल्याने वेळोवेळी निर्णय बदलले जात आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात टास्कफोर्सची बैठक घेण्यात आली त्यामध्ये आज रात्री 8 वाजेपासून सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त … Read more

शिक्षकांची मनपा कडून परीक्षा ; सिडको नाट्य गृहात कोरोना टेस्ट वरून गोंधळ

cidco

औरंगाबाद | शहरात रविवारी एमपीएससीची परीक्षा पार पडणार आहे. तत्पूर्वी पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. यासाठी शुक्रवारी शिक्षकांना कोरोना चाचणी करण्याकरिता बोलावण्यात आले होते. परंतु दोन तास चाचणी घेण्याकरिता कुणीच आले नाही. यामुळे मनपानेच शिक्षकांची परीक्षा घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच शहरात रविवारी विविध केंद्रावर … Read more

घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करा ; जिल्हा परिषद प्रशासनाचे आरोग्य विभागाला आदेश

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ज्या गावात कोरोनाचे रुग्ण आहेत त्या गावांमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करावी, असे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने आरोग्य विभागाला दिले आहेत. शहरी भागात असलेला कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर पसरला आहे . त्यामुळे आतापर्यंत बाधित 210 गावांत सुपर स्प्रेडरचा शोध आणि तपासणी तसेच लसीकरण फोकस करण्याच्या सूचना ग्रामीण … Read more

औरंगाबाद मध्ये धोका वाढतोय; घाटीत आणखी पंधरा कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू

ghati

औरंगाबाद, दि.१८: कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे.  घाटी रुग्णालयात आतापर्यंत मृत्यू होणाचे प्रमाण हे १०८४ एवढे होते त्यात आता आणखी १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आणखी भर पडली आहे. घाटीत मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये बिस्मिल्ला कॉलनी येथील ६५ वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्ण,  तर कन्नड येथील जैतखेडा येथील ३५ वर्षीय पुरुष, … Read more

नागरिकांनो सावधान! व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण….

औरंगाबाद | मनपा आरोग्य विभाग व जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या सहकायार्ने शहरात सहा ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. त्यातून 61 व्यापाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. एसएसएस शाळेत 119 पैकी 12 पॉझिटिव्ह, पैठण गेट 125 मधून आठ पॉझिटिव्ह, महावीर भवनात 77 पैकी 9 पॉझिटिव, शहागंज मध्ये 143 पैकी 13, अग्रसेन भवनात 150 पैकी … Read more

विना मास्कविरोधात आता मनपासोबतच पोलिसांची कारवाई, विना मास्क फिरणाऱ्या 165 जणांना दंड

औरंगाबाद | महापालिकेसोबतच आता पोलिसांनाही विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी केल्यानंतर मागील पाच दिवसांपासून कारवाई केली जात आहे. कारवाईतील हा संथपणा पाहता मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी याबाबत सूचना केल्या. कारवाया वाढवा, जनजागृती करा, कारवाई करताना मास्कचेही वाटप करा असेही त्यांनी सर्व पोलीस निरीक्षक यांना सांगितले. दरम्यान सोमवारी विना मास्क … Read more

पॉझिटिव्ह रूग्ण एक हजारांपर्यंत गेल्याने शहरात २१ कोवीड केअर सेंटर सुरू करणार

औरंगाबाद | शहरात दररोज एक हजार पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत असल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांवर कुठे उपचार करावेत, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला असून, युध्दपातळीवर २१ कोवीड केअर सेंटर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यातील ९ केंद्रे सुरूही झाली आहेत. आजा सुरू केलेले केंद्र दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हाउसफुल्ल होत आहे. दररोज … Read more