Thursday, March 30, 2023

विना मास्कविरोधात आता मनपासोबतच पोलिसांची कारवाई, विना मास्क फिरणाऱ्या 165 जणांना दंड

- Advertisement -

औरंगाबाद | महापालिकेसोबतच आता पोलिसांनाही विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी केल्यानंतर मागील पाच दिवसांपासून कारवाई केली जात आहे. कारवाईतील हा संथपणा पाहता मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी याबाबत सूचना केल्या. कारवाया वाढवा, जनजागृती करा, कारवाई करताना मास्कचेही वाटप करा असेही त्यांनी सर्व पोलीस निरीक्षक यांना सांगितले. दरम्यान सोमवारी विना मास्क फिरणाऱ्या 165 नागरिकांना एकूण 85 हजार 800 रुपये दंड ठोठावण्यात आला.

मागील नऊ महिन्यांपासून कोरोनामुळे लागलेल्या बंदोबस्तासाठी संपूर्ण पोलीस विभाग रस्त्यावर होता. करुणा चा प्रसार वाढताच पुन्हा नव्याने जुने निर्बंध खडक करण्यात आले यात विना मास्क फिरणार यावर प्रशासनाने पुन्हा कारवाया सुरू केल्या. यात मनपाचे निवृत्त सैनिकाचे पथक कारवाई करत असताना पोलीस विभागाने ही विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई सुरू कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या.त्यातून जमा होणाऱ्या दंडाच्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम पोलीस निधीसाठी तर उर्वरित प्रशासनाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी मनपाकडून पोलीस विभागाला पावती बूकही देण्यात आले आहे. ते सर्व पोलीस ठाण्यांना वाहतूक पोलिसांना वाटण्यात आले आहे त्यावरून कारवाई करण्याचे आदेश आहेत.

- Advertisement -

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.