कोविड केअर सेंटरच्या सुविधा तातडीने वाढवा ; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या सूचना

sunil chavaan

औरंगाबाद : ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसांत वाढत असलेला कोरोना संसर्ग वेळीच रोखण्यासाठी त्या ठिकाणी कोरोना चाचण्या आणि वाढीव रूग्णसंख्येच्या प्रमाणात कोविड केअर सेंटरच्या सुविधा तातडीने वाढविण्याचे निर्देश आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा दक्षता संनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने यंत्रणांना निर्देशित केले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी … Read more

रेल्वेतून येणाऱ्या इतर प्रवाशांचे काय? केवळ दिल्लीहुन येणाऱ्या प्रवाशांचीच होतेय कोरोना चाचणी

cheking

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा हा ६७ हजार पार जाऊन पोहोचला असताना दुसरीकडे प्रादुर्भाव कमी होण्यासाठी विशेष यंत्रणा उभी केली जात आहे. त्यासाठी कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात चाचणी केली जात आहे. रेल्वे स्थानकावर रेल्वेतून विविध ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांचे काय? असा देखील प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे. केवळ दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी केली जात … Read more

महापुरुषांची स्मारके उभारणीसाठी मागणी ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन

Statement

औरंगाबाद – संतांची भूमी असलेल्या पैठण शहरात महापुरुषांच्या स्मारकासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच लिगल सेल यांच्या वतीने पैठणचे तहसीलदार तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन महापुरुषांची स्मारके तात्काळ उभारण्याची मागणी केली आहे. पैठण शहरात छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकासाठी जागा नियोजीत करून स्मारकांची उभारणी करण्यासाठी … Read more

वैयक्तिक विहीर योजनेसाठी गटविकास अधिकाऱ्याना अधिकार; सिंचन क्षेत्र वाढण्यास होणार मदत

औरंगाबाद – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत देण्यात येणारी वैयक्तिक विहीर योजनेला मान्यता अधिकार आता पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना देण्यात आले आहेत. यामुळे वैयक्तिक विहीर घेणाºयांची संख्या त्याचबरोबर सिंचन क्षेत्रही प्रत्येक तालुक्यात वाढणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सिंचन विभागातून मिळाली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता … Read more

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला विक्रेत्यांची -खरेदीदारांची गर्दी

औरंगाबाद – जिल्ह्यात सर्वत्र अंशत: संचारबंदी लागू असताना औरंगाबादच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला विक्रेत्यांची आणि खरेदीदारांची मोठी गर्दी आज सकाळपासून उसळली होती.  मोठ्या संख्येने झालेली गर्दी आटोक्यात आणण्यासाठी बाजार समितीकडून कोणतीही तसदी घेण्यात आली नाही. शहरात सध्या कोरोना विषाणूने प्रचंड थैमान घातले आहे. आजच्या ताज्या आकडेवारीनुसार शहरातील संख्या हजारो पार गेली आहे. तर कोरोना … Read more

वन क्षेत्रातील वाढते अतिक्रमण धोकादायक; धडक कारवाई करण्याची अभ्यासकांची मागणी

forest

औरंगाबाद – वन क्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी एकीकडे प्रयत्न केले जात असतानाच दुसरीकडे वन क्षेत्रातील अतिक्रमण हा विषयही गंभीर होत चालला आहे. औरंगाबाद व जालन्यात मिळून सुमारे सहा हजार हेक्टर वन क्षेत्रावर अतिक्रमण असून ते हटविण्याबाबत अपवाद वगळता ठोस कारवाई का होत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, वन क्षेत्रातील अतिक्रमण ही गंभीर बाब … Read more

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

dcc election

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत 7 पैकी 6 उमेदवारांनी विजय मिळवत विरोधी पॅनलच्या उमेदवारांना धूळ चारली. विरोधी पॅनलमधील फक्त कृष्णा डोणगावकर हे गंगापूर मतदारसंघातून विजयी झाले. दुपारी १२ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व असल्याचे चित्र समोर आले आहे. शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार सोयगाव ता. सोसायटीमधून 22 मतांनी सुरेखा काळे … Read more

कोरोनाबकाळात महापालिकेकडून हॉटेलिंगवर तब्बल ६१ लाख ८४ हजार रुपये खर्च

aurangabad mahanagar

औरंगाबाद : कोरोना विषाणू संसर्गाच्या नियंत्रणासाठी निधीची कमतरता असताना महापालिकेने मात्र कोरोनाकाळात हॉटेलिंगवर तब्बल ६१ लाख ८४ हजार रुपये खर्च केल्याचे उघड झाले आहे. शहरातील चार हॉटेलांवर ही रक्कम खर्च करण्यात आली आहे. औरंगाबादेत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर एप्रिलच्या तिसºया आठवड्यापासून शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली. मे, जून, जुलै, आॅगस्ट असे … Read more

कोवीड सेंटरमध्ये महिलेची छेडछाड

crime 2

औरंगाबाद : पॉलिटेक्निक कॉलेजमधील कोविड सेंटरमध्ये एका महिलेसोबत छेडछाड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिलेने संबंधित डॉक्टरांकडे तक्रार केली असून, पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. वेदांतनगर येथील कोविड सेंटर येथे एका महिलेसोबत डॉक्टराने गैरवर्तन केल्याचे समोर आले होते. या प्रकरणात त्या डॉक्टरला निलंबित करण्यात आले होते. हे प्रकरण घडल्यानंतर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये … Read more

कोरोना संसगार्चा वेग वाढला; मृत्यूदरही वाढल्याने चिंता

Corona

औरंगाबाद – शहरात करोनाबाधितांचे प्रमाण वाढत चालले आहे. पालिकेकडून मिळालेल्या अहवालानुसार शंभर चाचण्यांमागे ३२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह निघत आहेत. पॉझिटिव्हिटी दराबरोबरच मृत्यूदरही वाढला आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण काही दिवसांपूर्वी ९६ टक्क्यांवर होते, ते आता ८० टक्क्यांवर आले आहे. जिल्ह्यात फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. ५ मार्चपासून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. … Read more